ओटवणे /प्रतिनिधी-
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी सैनिक बँकेचे महाव्यवस्थापक सुनिल राऊळ यांची एकमताने निवड करण्यात आली. तर सचिवपदी बाबली गवंडे यांची फेरनिवड करण्यात आली. संस्थेचे जिल्हाअध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत एक वर्षासाठी या कार्यकारणीची निवड करण्यात आली.
संस्थेची उर्वरीत कार्यकारणी पुढीप्रमाणे उपाध्यक्ष दीपक तारी, मंगल कामत, सहसचिव अनिकेत सावंत, खजिनदार सिद्धार्थ पराडकर, सहखजिनदार सुप्रिया मोडक, सदस्य संदीप चांदेकर, राकेश परब, निलेश मोरजकर, विद्याधर नाईक, हेमंत मराठे, तानाजी खोत, सौरभ पडते, रविंद्र तावडे, काका भिसे, जयगणेश गावकर, सल्लागार सुधीर पराडकर आणि आनंद वेंगुर्लेकर
यावेळी संस्थेच्या जिल्हा सल्लागारपदी सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक दयानंद गवस यांची तर सावंतवाडी व दोडामार्ग तालुका विभागीय अध्यक्ष म्हणून संजय पिळणकर यांची निवड करण्यात आली.









