कुडाळ/प्रतिनिधी-
कुडाळ येथील प्रसिद्ध सर्जन डाॕ. नंदन आत्माराम सामंत ( ६६ ) यांचे शनिवारी मध्यरात्री गोवा येथील व्हिजन रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. डाँ. सामंत यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना काल सायंकाळी गोवा येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. त्यांच्या निधनाची बातमी पहाटे कुडाळसह परीसरात पसरताच सर्वांन धक्का बसला. ते उत्तम शल्यविशारद होते. तसेच अन्य अनेक विषयांचे ते सखोल अभ्यासक होते. कुडाळसह सिंधुदुर्ग जिल्हा डाँ. सामंत यांच्या जाण्याने एका जाणकार डाँक्टरला मुकला आहे. परुळे – वेंगुर्ले येथील ते मूळ रहिवासी असून गेली बरीच वर्षे कुडाळ – अभिनवनगर येथील कर्तव्य साधना रूग्णालयात ते रुग्णसेवा देत होते.
अचुक निदान व उपचार यासाठी ते परीचित होते. लायन्स क्लबचे ते माजी पदाधिकारी होते.या क्लबच्या उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता. सिंधुदुर्ग रेडिओलॉजिस्ट सेंटर चे ते संचालक होते. मालवणी भाषेवर त्याःचे प्रभुत्व होते. सभा संमेलनात ते आपले विचार परखडपणे मांडायचे. त्यांच्या अकाली निधनाने निष्णात डाँक्टर व अभ्यासू व्यक्तीमत्व हरपले. त्यांच्या
पश्चात पत्नी , मुलगा ,मुलगी ,सून , भाऊ, बहिण असा परीवार आहे.









