प्रतिनिधी / कुरुंदवाड
कुरुंदवाड शहराच्या विकासासाठी 6 महिन्याच्या आत कोटयवधी रुपयांचा निधी देऊन शास्वत विकास करून येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना सामोरे जाईल.आणि पालिकेवर भगवा फडकवणार असे ठाम मत राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. येथील भालचंद्र थिएटर येथे शिवसेना चैतन्य मेळावा व शिवसेनेच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी खास.धैर्यशील माने होते.जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, माजी आमदार उल्हास पाटील, महिला आघाडी संपर्कप्रमुख दिव्या बडवे आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. माने म्हणाले 2019 सालच्या महापूराने कोल्हापूर जिल्हा पुरता घाईला आला आहे. कोरोना आपत्तीसाठी केंद्र सरकारने खासदारांचे निधी गोठवले आहेत.त्यामुळे राज्यसरकारवर मोठी जबाबदारी पडली आहे.त्यामुळे माझ्या मतदार संघातील शिरोळ तालुक्याला आपल्याकडून निधी मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो.
यावेळी बोलताना माजी आम. उल्हास पाटील यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि कुरुंदवाड,जयसिंगपूरच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार निवडून आणून तालुक्यात भगवा फडकवून विधानसभेच्या पराभवाचा वचपा काढू असे सांगितले.
स्वागत व प्रास्ताविक करताना तालुकाप्रमुख वैभव उगळे म्हणाले शहरातील ऐतिहासिक वास्तु पुरातत्व विभाग,पालिका आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने धूळखात पडल्या आहेत. तर शहराचा विकास रखडला आहे. त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आपल्या खात्यातून निधी मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करत काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ताकतीने उतरणार असून शिवसेनेचा भगवा पालिकेवर फडकवणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील, मंगलताई चव्हाण आदींनी भाषणे केली.
ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तालुक्यातील कनवाड,अकिवाट येथील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला मान्यवरांच्या हस्ते त्यांना शिवबंधन बांधण्यात आले.
या मेळाव्याला माजी तालुका प्रमुख सतीश मलमे,जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समिती सभापती स्वाती सासणे,संतोष धनवडे, दिलीप भेंडवडे, प्रतीक धनवडे, बाबासाहेब सावगावे, पराग पाटील, संजय माने, मिलिंद गोरे, आप्पासाहेब भोसले, संतोष नरके, सलीम दबासे, पंत माळी,पंचायत समितीच्या सभापती कविता चौगुले, माधुरी ताकारी, रेखा जाधव, वैशाली जुगळे, जालिंदर सांडगे, पप्पू पागे सह आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेनेची आदरयुक्त दादागिरी आहे. बाकीच्यांच्या तलवारीची दादागिरी आता संपली आहे. असे मंत्री सामंत यांनी माजी मुख्यमंत्री व भाजपाचे नेते नारायण राणे यांचे नाव न घेता भीमटोला लगावला. या मेळाव्यात शिवसेना तालुकाप्रमुख वैभव उगळे यांनी मांडलेल्या शहराचे प्रश्नाबाबत मंत्री सामंत यांनी भालचंद्र थेटर चे सहा महिन्याच्या आत पुनरुज्जीवन करू व येथील ऐतिहासिक कुस्ती मैदानासाठी 2 कोटी रुपयांचा निधी निश्चित देऊ असे मी वचन देतो असे नमूद केले.