कुडाळ / प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोणा च्या रुग्ण संख्येत विक्रमी वाढ झाली आहे अशातच जिल्ह्यातील एकमेव कोवीड रुग्णालय जिल्हा रूग्णालय सिंधुदुर्ग येथे डॉक्टरांना सुद्धा कोरोणा ची लागण झाल्यामुळे ही वैद्यकीय सेवा संभाळण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने आपला मदतीचा हात कुठल्याही अपेक्षे शिवाय दिला आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा इंडियन असोशिएशनचे अध्यक्ष डाँ. संजय केसरे यांनी दिली.
जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व व जिल्हा शल्यचिकित्सक सिंधुदुर्ग यांच्या आवाहनानंतर त्वरित जिल्ह्यातील तिन आय एम ए यांच्या शाखेतून हा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये कुडाळ सावंतवाडी शिरोडा वेंगुर्ला शाखेचे अध्यक्ष डॉक्टर संजय केंसरे तसेच सेक्रेटरी अमोघ चुबे मालवण शाखेचे अध्यक्ष डॉक्टर अजित लीमये व सेक्रेटरी डॉक्टर हरिष परुळेकर कणकवली डॉक्टरचे अध्यक्ष डॉक्टर नितीन शेटे व सेक्रेटरी डॉक्टर प्रफुल आंबेरकर तसेच जिल्हा टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉक्टर शंतनू तेंडुलकर डॉक्टर वादी राज सौदत्ती आणि आणि इतर वरिष्ठ आय एम ए चे सभासद यांच्या एक मुखी निर्णयामुळे रविवार दिनांक 6 सप्टेंबर पासून जिल्हा रुग्णालय कोबीड सेंटर येथे रुग्णसेवेसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स रुजू झाले आहेत
पहिल्याच दिवशी डॉक्टर संजय केसरे अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन व डॉक्टर जी टी राणे फिजिशियन कुडाळ डॉक्टर विद्याधर तायशेटे सर्जन कणकवली यांनी सेवा दिली सोमवार पासून दररोज जिल्हा रुग्णालयांमध्ये तीन डॉक्टर्स सेवा देतील ही सेवा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स उपलब्ध होई पर्यंत देण्यात येईल जिल्ह्यातील जनतेचे आरोग्य हे आमचे प्रमुख कर्तव्य आहे आणि रुग्ण सेवेच्या भावनेतून हा निर्णय घेण्यात आल्याचा डॉक्टर
जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांचे कौतुक होणे गरजेचे आहे कारण हा निर्णय सर्व डॉक्टरांनी उस्फूर्तपणे घेतला आहे कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता फक्त आणि फक्त जिल्ह्यातील रूग्णसेवेला मान देऊन ही सेवा देण्यात येत असले बाबत सांगितले समाजामध्ये डॉक्टरांविषयी बरेच गैरसमज आहेत डॉक्टर रुग्ण नाते सुधारण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल समजले जात आहे डॉक्टरांना मारहाण होणे हॉस्पिटलची तोडफोड होणे इत्यादी घटना घडू नयेत याची जाणीव समाजाने ठेवली पाहिजे
जिल्ह्यात तीन *इंडियन मेडिकल असो अलोपॅथी संघटना काम करतात , कुडाळ/सावंतवाडी/वेंगुर्ला/शिरोडा , दुसरी मालवण आणि तिसरी कणकवली , या सर्वांची शिखर संघटना म्हणून इंडियन मेडिकल असो सिंधुदुर्ग नावाने परिचित आहे। यांचे प्रतिनिधी म्हणून डॉ संजय केसरे जे कुडाळ शाखेचे अध्यक्ष आहेत ते काम पाहतात । यात एम बी बी एस आणि त्यावर शिकलेले तज्ञ डॉ सदस्य आहेत , या सर्वांनी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्सना कोविड ची बाधा झाल्यावर शासकीय आरोग्य यंत्रणा मोडकळीस येऊ नये म्हणून जिल्हाधिकारी मॅडम मंजूलक्ष्मी आणि जिल्हाशल्यचिकित्सक श्री चाकूरकर यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन जिल्हारुग्णालयात धाव घेऊन लगेच काम सुरू केले , त्याप्रमाणे आज डॉ गिरीश राणे फिजिशियन कुडाळ, डॉ संजय केसरे कुडाळ आणि डॉ विद्याधर तायशेट्ये यांनी ड्युटी केली ,या प्रमाणे रोज तीन डॉक्टर आपली सेवा जिल्हारुग्णालयात देणार आहेत. संकटकाळी कोणत्याही मानधनाशिवाय काम करताना आणि निस्वार्थी भावनेने काम करण्याचे जिल्ह्याच्या आय एम ए संघटनेने एक वेगळाच आदर्श समाजापुढे ठेवलेला आहे , सामाजिक बांधिलकी म्हणजे काय असते ह्याचा वस्तुपाठ जिल्ह्यातील खाजगी डॉक्टर्सनी एकत्र येऊन दाखविला आहे त्या समाजाने डॉक्टरप्रति आपला दृष्टिकोन आतातरी बदलावा ही माफक अपेक्षा खाजगी डॉक्टर्सनी याप्रसंगी केली आहे
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









