ओटवणे/ प्रतिनिधी-
सिंधुदुर्ग जिल्हा अन्न व औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त पदी मिलिंद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आली असून औषध निरीक्षक पदाचा कार्यभारही त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे.
सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने सहाय्यक आयुक्त मिलिंद पाटील यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी श्री पाटील यांच्यासोबत अनेक विषयावर चर्चा केली. तब्बल एक वर्षानंतर कायमस्वरूपी जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्तपदी मिलिंद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री पाटील तीन वर्षानंतर सेवानिवृत्त होणार असून ते बेळगाव येथील आहेत. ते एम फार्म असून त्यांचे शिक्षण ठाणे व अहमदाबाद या ठिकाणी झालेले आहे.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम, माजी अध्यक्ष दयानंद उबाळे, सहसचिव प्रसाद तेरसे, खजिनदार विवेक आपटे, कणकवली तालुका अध्यक्ष विजय घाडी, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष विभा खानोलकर, सावंतवाडी तालुका सचिव संतोष राणे, मकरंद घळसासी, सुहास गावडे, अमर गावडे, सचिन भानुशाली, रोहित नाईक आदी उपस्थित होते.