सावंतवाडी/प्रतिनिधी-
कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत चालली असून अनेक गावे कोरोना मुक्तच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या मानसिकतेत झालेल्या बदलामुळे अखेर शासनाने इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. ज्या गावात कोरोना प्रसार नसेल त्या गावात आता शाळा सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पाच जुलै रोजी शासनाने तसा आदेश जारी केला आहे. शाळा सुरू करताना कोरोनाचे सर्व नियम पाळावे लागणार आहेत.
इयत्ता आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करताना सकाळ अथवा दुपारच्या सत्रात वेळेनुसार शाळा सुरू करावी लागणार आहे. त्यामध्ये एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर, एका वर्गात कमीत कमी 15 ते 20 विद्यार्थी, साबणाने हात धुणे, मास्कचा वापर करणे, कोरोनासदृष्य कोणतेही लक्षण असल्यास घरी पाठवणे असे नियम घालण्यात आले आहेत. तसेच शाळा सुरू करताना ग्रामस्थांचा ठराव घ्यावा लागणार आहे









