एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 676 : सक्रिय रुग्णसंख्या 206 : आणखी 18 पॉझिटिव्ह : दोघांचा मृत्यू
- जि.प.तील काही अधिकारी, कर्मचारी सेल्फ क्वारंटाईनमध्ये
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण झपाटय़ाने वाढत असताना कोरोना नमुना चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. आतापर्यंत 10 हजार 126 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी येथे दिली. दरम्यान, मंगळवारी आणखी 18 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. जि. प. मध्ये तिघा कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेक अधिकारी, कर्मचारी सेल्फ क्वारंटाईन झाले आहेत. जि. प. पदाधिकाऱयांनीही जिल्हा परिषदेकडे पाठ फिरवली होती.
कोरोना बाधित स्थानिक रुग्णही आढळू लागल्याने ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे कोरोना चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 10 हजार 126 चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तात्काळ निदान होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे शक्मय होत आहे.
जिल्हय़ात आणखी 18 पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू
जिल्हय़ात मंगळवारी आणखी दोन रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. मालवण तालुक्मयातील देवली येथील 17 वषीय युवकाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबरोबरच त्याला किडनीचा आणि डायबेटिसचा आजार होता. तसेच दोन दिवसांपूर्वी खारेपाटण येथील एका युवकाचा मृत्यू झाला होता. त्याचा मृत्यूपश्चात अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याला झटके येण्याचा त्रास होता तसेच मेंदूला सूज होती, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली.
नव्याने आढळलेल्या 18 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कुडाळ तालुक्मयातील सोनवडे – दोन, कणकवली तालुक्मयात कणकवली – दोन, खारेपाटण – एक, मालवण तालुक्मयात देवली – दोन, वेंगुर्ले तालुक्मयात शिरोडा – आठ, सावंतवाडी तालुक्मयात सावंतवाडी – एक, माठेवाडा – दोघांचा सामवेश असून एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 676 झाली आहे.
सातजणांना डिस्चार्ज
मंगळवारी आणखी सात रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 456 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर 14 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कोरोना सक्रिय 206 रुग्ण असून त्याच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
जि. प. अधिकारी, कर्मचारी धास्तावले
जि. प. च्या शिक्षण विभागातील तिघा कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाल्यानंतर जि. प. मधील सर्वच कर्मचारी धास्तावले आहेत. शिक्षण विभाग बंद ठेवण्यात आला आहे. परंतु पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱयांचा संपूर्ण जि. प. मध्ये वावर राहिल्याने जिल्हा परिषदच काही दिवसांसाठी बंद ठेवावी, अशी मागणी कर्मचारी करीत आहेत. मात्र अद्याप त्याबाबत निर्णयच झालेला नाही. मात्र काही अधिकारी, कर्मचारी ‘सेल्फ क्वारंटाईन’ झाले आहेत. त्यामुळे जि. प. भवनमध्ये मंगळवारी कर्मचाऱयांची उपस्थिती कमीच दिसत होती. जि. प. पदाधिकाऱयांनीही पाठ फिरवली होती.
चार दिवसात रेल्वेने आले फक्त 358 चाकरमानी
सरकारने चाकरमान्यांसाठी रेल्वे सोडल्या खऱया. मात्र त्या वेळेत न सोडल्याने चाकरमान्यांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. चार दिवसांत फक्त 358 प्रवासी रेल्वेने दाखल झाले. तसेच एसटी बस किंवा खासगी गाडय़ांनी येणाऱया चाकरमान्यांचा वेगही मंदावला आहे. मंगळवारी फक्त 291 चाकरमानी आले, तर 14 ते 18 ऑगस्टपर्यंत पाच दिवसात 1 हजार 775 व्यक्ती जिल्हय़ात दाखल झाल्या.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 10126
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 676
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 9224
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 226
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 206
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 14
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 456
अलगीकरणातील एकूण व्यक्ती 22777
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 4125
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 198800
सद्यस्थितीत सक्रिय कंटेनमेंट झोन 79









