एका दिवसात 197 पॉझिटिव्ह, 37 रुग्णांची प्रकृती चिंताजनक
कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 55 रुग्ण
सक्रिय रुग्णांची संख्या एक हजारावर
बाधित रुग्णांची एकूण संख्या आठ हजारावर
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिह्यात कोरोनाची रुग्णसंख्य दिवसागणिक झपाटय़ाने वाढत असून रविवारी एका दिवसात 197 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या आठ हजारावर तर सक्रिय रुग्णसंख्या एक हजारावर गेली आहे. 37 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
जिल्हय़ात गेल्या दहा-बारा दिवसांपासून प्रचंड वेगाने कोरोनाचे रुग्ण वाढत असून आता तर कहरच झाला आहे. रविवारी तब्बल 197 रुग्ण आढळले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णसंख्या 8 हजार 184 झाली आहे. तर आणखी 27 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याने आतापर्यंत एकूण 6 हजार 809 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच आतापर्यंत 196 जणांचे बळी गेले असून सद्यस्थितीत जिल्हय़ात 1,173 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सक्रिय रुग्णांमध्ये 37 जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यातील 30 रुग्ण ऑक्सिजनवर तर सात रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
अशी आहे रुग्णसंख्या
रविवारी नव्याने आढळलेल्या 197 रुग्णांमध्ये कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 55 रुग्ण आहेत. कणकवली 31, देवगड 32, दोडामार्ग 11, मालवण 23, सावंतवाडी 23, वैभववाडी 12, वेंगुर्ले 9 आणि जिल्हय़ाबाहेरील एक रुग्ण आहे.
सिंधुदुर्ग जिह्यातील सद्यस्थिती – आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण- 197, सद्यस्थितीतील सक्रिय रुग्ण – 1,173, सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्हय़ाबाहेर गेलेले रुग्ण-6, आजअखेर बरे झालेले रुग्ण- 6,782, आजअखेर मृत झालेले रुग्ण- 196, आजपर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- 8,184, पॉझिटिव्हपैकी चिंताजनक रुग्ण-37.
तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण
देवगड – 750, दोडामार्ग – 419, कणकवली – 2330, कुडाळ – 1767, मालवण – 816, सावंतवाडी – 1072, वैभववाडी – 317, वेंगुर्ले – 665, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – 48.
तालुकानिहाय सक्रिय रुग्ण : देवगड – 218, दोडामार्ग -45, कणकवली – 208, कुडाळ -230, मालवण -149, सावंतवाडी -126, वैभववाडी – 96, वेंगुर्ले – 85, जिह्याबाहेरील – 16.
तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू – देवगड – 15, दोडामार्ग – 5, कणकवली – 50, कुडाळ – 36, मालवण – 21, सावंतवाडी – 44, वैभववाडी -14,वेंगुर्ले -10, जिह्याबाहेरील रुग्ण – 1.
टेस्ट रिपोर्टस्- आर.टी.पी.सी.आर. आणि ट्रुनॅटटेस्ट – तपासलेले नमुने : आजचे -1,233, एकूण-49,579, पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने-5,626. ऍन्टिजन टेस्ट-तपासलेले नमुने : आजचे- 321, एकूण-31,926, पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने-2,717.
पॉझिटिव्हपैकी अतिदक्षता विभागात असलेले -37, ऑक्सिजनवर असणारे- -30, व्हेंटिलेटरवर असणारे-7.









