वाडा-पडेल येथील माई परब यांचे कुटुंब रुग्ण सेवेत मग्न : मुंबई, कणकवलीतील रुग्णालयात कार्यरत
दत्तप्रसाद पेडणेकर / मसुरे:
आरोग्य विभागात काम करणारे जिल्हय़ातील देवगड-वाडा-पडेल येथील समाजसेविका आणि राष्ट्रवादीच्या नेत्या माई परब यांचे कुटुंब आरोग्याच्या माध्यमातून देशसेवेत मग्न आहे. एकाच कुटुंबातील पाचजण कोरोना योद्धा म्हणून मुंबई आणि सिंधुदुर्गात रुग्णसेवा करत आहेत. मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयात संतोष राजाराम परब आणि त्यांची पत्नी शामल संतोष परब, तर कणकवली शासकीय रुग्णालयात मनोहर राजाराम परब व त्यांची पत्नी मिनल मनोहर परब आणि मुंबईतील जसलोक रुग्णालयात प्रथमेश उर्फ स्वामी परब हे कोरोना योद्धा म्हणून लढत आहेत. एकाच कुटुंबातले हे पाच योद्धे जिल्हय़ाचे खऱया अर्थाने भूषण ठरले आहेत.
हिंदुजा रुग्णालयात संतोष परब हे सिक्मयुरिटी डिपार्टमेंटचे प्रमुख म्हणून काम पाहताहेत. भारतीय कामगार सेना युनियनचे पदाधिकारीही ते आहेत. काही रुग्णांना प्रवेशद्वारापर्यंत चालण्याचीही ताकद नसते. अशांना ते उचलून आणून रुग्णालयात दाखल करतात.
कोरोना पॉझिटिव्ह होऊनही पुन्हा कार्यरत
संतोष आणि त्यांची पत्नी सौ. शामल या रुग्णसेवेमुळे कित्येक दिवस परिवारापासून लांब असतात. मुलांनाही त्यांना भेटता येत नाही. हे दाम्पत्य काम करत असताना कोरोना पॉझिटिव्ह झाले, तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली पण ते न डगमगता त्यातून बरे झाल्यावर पुन्हा कोरोना रुग्णांच्या सेवेत दाखल झाले. संतोष यांनी 40 बेडचे सुविधा असलेले तीन वॉर्डमध्ये रुग्णालयातील कर्मचाऱयांना दाखल करून त्यांची योग्य काळजी घेतात. संतोष युनियन लीडर असल्याने कामगारांची ते नेहमी काळजी घेतात.
आईचा समाजसेवेचा वारसा चालवितो!
संतोष म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही सैनिक असल्यामुळे जनसेवा हीच ईश्वर सेवा हा त्यांचा संदेश पाळून आमचे कुटुंब कार्यरत आहे. तसे पाहता, युनियन लीडर असल्यामुळे रुग्णालयातील कामकाजापासून मी किंवा माझी पत्नी दूर राहू शकत होतो. आमची आई माई परब या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरि÷ नेत्या आणि समाजसेविका असल्यामुळे त्यांचा समाजसेवेचा वारसा आम्ही शिकलो. माई परबही अभिमानाने सांगतात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णसेवा करणारी ही पाचही मुले माझा परिवार असल्याचा मला अभिमान आहे. यापुढेही हे पाचही जण रुग्णसेवा करतच राहतील. स्वतःचा जीव धोक्मयात घालून ते काम करत आहेत, ते जिल्हय़ासाठीही भूषणावह आहे.
जीवनावश्यक वस्तूंचेही वाटप
संतोष परब यांनी आपल्या बोरिवली भागात समाजसेवेचे व्रत जपताना अनेक निराधार आणि गरजवंत कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. त्यांनी जिल्हय़ातील सुमारे 50 जणांना रुग्णालये वा इतर ठिकाणी नोकरी मिळवून दिली होती. कित्येक कुटुंबांना संतोष यांनी मदत केली असून गरीब आणि गरजू कुटुंबाच्या मागे ते सतत देवदूताप्रमाणे उभे असतात. संतोष यांचे मूळ वाडा-पडेल या गावी समाजसेवेचे मोठे काम असून गावांमध्ये त्यांचे सर्व क्षेत्रांत मोठे योगदान आहे. जिल्हय़ातील दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
वरिष्ठांचे चांगले सहकार्य
शामल परब म्हणाल्या, रुग्णालयाचे सर्व डॉक्टर, वरि÷ पदाधिकारी यांनी आम्हा सर्वांना वेळोवेळी धीर देऊन प्रोत्साहन दिले. घाबरलेल्या रुग्णांचे आम्ही सर्व मनोधैर्य वाढवत होतो. तेच रुग्ण बरे होऊन घरी जाताना त्यांच्या चेहऱयावरील आनंदाश्रू पाहताना मन भरून येते. प्रशासनाच्या वरि÷ अधिकाऱयांनीही त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
कणकवलीतही परब कुटुंबिय कार्यरत
मनोहर परब आणि मिनल परब हे दाम्पत्य कणकवली येथील शासकीय रुग्णालयात कोरोना योद्धा म्हणून चांगले काम करत आहेत. मनोहर हे क्लार्क, तर मिनल मेट्रन आहेत. रुग्णालयातील रुग्णांची सेवा ते करत आहेत. त्यांचा मुलगा प्रथमेश उर्फ स्वामी हा मुंबईतील जसलोक रुग्णालयात रुग्णसेवेत मग्न आहे. माई परब यांच्या कुटुंबातील पाचही कोरोना योद्धय़ांना सलाम.









