सिंधुदुर्ग / प्रतिनिधी:
राज्य शासनाच्या निर्देशानुसार हॉटेल, दुकाने, शॉपिंग मॉल्स, सलून, इनडोअर स्पोर्टस १५ ऑगस्टपासून रात्री दहापर्यंत सुरु ठेवण्यास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मंजुरी दिली आहे. मात्र यासाठी दुकान मालक, कर्मचारी यांनी दोन डॉस घेतलेले अनिवार्य असून दुसरा डोस घेतल्यावर १४ दिवस पूर्ण होणे आवश्यक आहे. हॉटेल आणि सलून ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील असे आदेशात म्हटले आहे. खुल्या प्रांगणातील विवाह सोहळा २०० मर्यादेत तर बंदिस्त हॉलमधील लग्न सोहळे १०० च्या मर्यादेत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.