सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकुर यांचा पुढाकार : जिल्हाधिकाऱयांशी साधला संपर्क
डॉ. अमेय देसाई यांची माहिती पाच तालुक्यात प्रत्येकी दहा सिलिंडर
प्रतिनिधी / कुडाळ:
कोविड काळात सध्या रुग्णांच्या सेवेसाठी अत्यावश्यक बाब म्हणून सारस्वत बँक सिंधुदुर्ग जिल्हय़ाला 50 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर देणार आहे. तशी माहिती सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकुर यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून दिली. येत्या काही दिवसांत हे सिलिंडर जिल्हय़ात दाखल होतील, अशी माहिती डॉ. अमेय देसाई यांनी दिली आहे. पाच तालुक्मयातील कोविड केंद्रात प्रत्येकी दहा जम्बो सिलिंडर देऊन जिल्हा रुग्णालयाचा ताण कमी करण्याचे ठरविण्यात आले आहे.
गेल्या काही आठवडय़ांपासून सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडून ऑक्सिजन प्रश्न समजून घेत होतो. जिल्हय़ातील सर्व रुग्णांना उपचारांसाठी आवश्यक ऑक्सिजनचा साठा कसा करायचा? हा प्रश्न जिल्हय़ात निर्माण झाला होता. तो सोडविला, तर बऱयाच प्रमाणात समस्या सुटेल, अशी परिस्थिती असल्याचे लक्षात आले. त्यादृष्टीने बायोमेडिकल इंजिनिअर विठ्ठल सरनाईक यांच्याकडून अधिक तांत्रिक गोष्टी जाणून घेतल्या. यासाठी खर्च मोठा होता. हा प्रश्न सुटण्यासाठी काय करता येईल, या विचारात असताना याबाबत सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकुर यांना निवेदन द्यायचे असे ठरविले. ठाकुर यांनी सिंधुदुर्गात वैद्यकीय, सामाजिक कार्याला वेळोवेळी पाठिंबा दिला आहे. त्या अनुभवाच्या शिदोरीवर त्यांना ई-मेल केला, असे डॉ देसाई यांनी सांगितले.
ठाकुर यांनी लागलीच जिल्हाधिकारी यांना दूरध्वनी करून सारस्वत बँक सिंधुदुर्ग जिल्हय़ाला 50 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी डॉ. देसाई यांच्याशी चर्चा केली. पाच तालुक्मयातील कोविड केंद्रात प्रत्येकी दहा जम्बो सिलिंडर देऊन जिल्हा रुग्णालयाचा ताण कमी करण्याचे ठरले आहे.
त्या अनुषंगाने येत्या काही दिवसांत हे जम्बो ऑक्सिजन सिलिंडर सिंधुदुर्गात दाखल होतील. ते पाच तालुक्मयात विभागले जातील. जेणेकरून प्रत्येक केंद्रात किमान दहा ऑक्सिजन बेड वाढतील. रुग्णांना आपल्या तालुक्मयातील ठिकाणी ऑक्सिजन मिळाल्याने त्यांची प्रवासासाठी होणारी फरफट थांबेल. पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर तिसऱया लाटेसाठी जिल्हा सज्ज होण्यासाठी याची मोलाची मदत होईल. ठाकुर यांची संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी यामुळे हे शक्मय झाले, असे डॉ. देसाई यांनी म्हटले आहे.









