- जागतिक सी. ए. परीक्षेत मिळविले अभूतपूर्व यश
- तन्वी देवगड-फणसगावची सुकन्या
- अमेरिकेच्या एफ. आर. एम. परीक्षेत मिळविली विशेष गुणवत्ता
- प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतले जिल्हा परिषदेच्या शाळेत
- कोकणातील यंगेस्ट सी.ए. बनण्याचा मिळविला होता बहुमान
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी सी. ए. डिग्री मिळवत सर्वात यंगेस्ट सी.ए. बनण्याचा बहूमान संपादन करणारी सिंधुकन्या सौ. तन्वी नाईक-नारकर हिने आता वयाच्या 32 व्या वर्षी जागतिक स्तरावरील सी.ए. परीक्षा म्हणून ओळखल्या जाणाऱया अमेरिकेच्या फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंट (एफ.आर.एम.) परीक्षेत अभूतपूर्व यश मिळवत कोकणी गुणवत्तेचा झेंडा अटकेपार रोवला. ही परीक्षा अकौंटिंग क्षेत्रातील जगातील अत्यंत कठीण समजली जाते. एफ.आर.एम. ही डिग्री मिळवणारी व्यक्ती जगभरातील कुठल्याही बँकेत वा मोठय़ा वित्तीय संस्थेत सी.ए. म्हणून सेवा देण्यास पात्र ठरू शकते.
तन्वी ही देवगड तालुक्यातील फणसगावची सुकन्या आहे. फणसगाव येथील शिक्षक विलास नारकर यांची ती कन्या होय. फणसगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण तर तेथीलच हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षणाचे धडे घेतल्यानंतर तिने कोल्हापूर येथील रत्नाप्पा कुंभार महाविद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर तिने सी.ए. चा अभ्यास सुरू केला. आपल्या पहिल्या
प्रयत्नातच 2010 मध्ये तिने सी.ए.ची पदवी प्राप्त केली. सी.ए. करत असतानाच तिने आपले बी. कॉम. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अर्थशास्त्र विषय घेऊन मास्टर्स म्हणजेच पदव्युत्तर पदवीदेखील मिळविली. सी.ए. उत्तम गुणवत्तेत पास होऊनही स्वतंत्र प्रॅक्टिस करण्याचा विचार तिने सोडून दिला. ग्राहकांना टॅक्स अव्हॉईड करण्याच्या पळवाटा सूचविणे तिच्या तत्वात बसणारे नव्हते. त्यामुळे तिने सी.ए. म्हणून स्वतंत्र पॅक्टिस न करण्याचा निर्णय घेतला. याचवेळी तिच्यातील गुणवत्ता हेरत सारस्वत बँकेने कोल्हापूर येथे तिला अधिकारीपदाची संधी देत आपल्या सेवेत सामावून घेतले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर अभूतपूर्व यश
सारस्वत बँकेत सेवा देत असतानाच तन्वीने सी.ए.च्या पुढची डिसा (डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन सिस्टिम ऑडिट) ही परीक्षा देऊन त्यात विशेष गुणवत्तेसह यश मिळविले. तद्नंतर तिने इंडियन इन्स्टिटय़ुट ऑफ बँकिंग परीक्षेतही विशेष गुणवत्तेसह यश मिळविले. लग्न झाल्यानंतर ती अमेरिकेत गेली. अमेरिकेतील आपल्या या वास्तव्यादरम्यान ‘सीसा’ म्हणजेच ‘सर्टिफाईड इन्फॉर्मेशन सिस्टिम ऑडिटर’ ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची महत्वपूर्ण परीक्षा देत त्यातही यश मिळविले. या यशानंतर तन्वीने ‘गार्फ’ या अमेरिकन इन्स्टिटय़ुटतर्फे घेतल्या जाणाऱया ‘एफ.आर.एम.’ या अत्यंत कठीण अशा पदवी परीक्षेची तयारी सुरू केली व आपल्या गुणवत्तेच्या जोरावर अभूतपूर्व यश मिळविले. तन्वी सध्या गोव्यात आली आहे. नुकताच एफ.आर.एम. परीक्षेचा निकाल तिला प्राप्त झालाय. अकौंट क्षेत्रात जगात अत्यंत कठीण म्हणून ओळखल्या जाणाऱया या परीक्षेत मिळालेले हे यश पाहून तन्वी व तिच्या कुटुंबियांना प्रचंड आनंद झाला आहे.
हे यश माझ्या मेहनतीचे!
‘आपल्या या यशाचा आनंद ‘तरुण भारत’सोबत शेअर करताना तन्वी म्हणते, “हे माझ्या अथक प्रयत्नांचे यश आहे. प्रामाणिकपणे लक्ष केंद्रीत करून मेहनत घेतली तर यश नक्कीच मिळते. मला माझ्या मेहनतीचे फळ मिळाले. सिंधुदुर्गातील फणसगावसारख्या एका मराठी माध्यमाच्या शाळेत शिकूनही मी हे यश मिळवू शकले, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. लहानपणापासून पुस्तकांना भावंड मानून मी मोठी झाले. पुस्तकांनी, माझ्या आई-बाबांनी, शिक्षकांनी मला घडविले. माझ्या पतीचीही मला उत्तम साथ मिळाली. कोकणची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवू शकले, याचाही मला अभिमान वाटतो. कोकणातील मुले गुणवत्तावान निश्चितच आहेत. या गुणवत्तेला मेहनतीची जोड दिली तर येथील प्रत्येक विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या गुणवत्तेची छाप पाडू शकेल’’, असे ती सांगते. ी. त्याबाबत चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी दिले. तर रजा न टाकताच मुख्यालय सोडणाऱया शिक्षकांची चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली. तसेच घरबांधणीच्या नियमात अनेक जाचक अटी असल्याने त्या कमी करण्यासंदर्भात खास बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.









