नवी दिल्ली : ग्वाल्हेरच्या राजमाता विजया राजे सिंधिया यांच्या सन्मानार्थ काढण्यात आलेले 100 रुपयांचे नाणे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केले. व्हर्च्युअल प्रोग्रामच्या माध्यमातून सिंधिया कुटुंबीयांच्या उपस्थितीत या नाण्याचे अनावरण करण्यात आले. विजया राजे सिंधिया यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हे नाणे जारी करण्यात आले आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या या 100 रुपयांच्या नाण्याच्या दोन्ही बाजूंची खास रचना करण्यात आली आहे. या नाण्याच्या एका बाजूला राजमाता विजया राजे सिंधिया यांचे चित्र आहे. त्याच बाजूला ‘श्रीमती विजया राजे सिंधिया यांची जन्मशताब्दी’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









