1 जुलैपासून बदल लागू होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कॅनरा बँकेने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार जुन्या सिंडिकेट बँकेतील सर्व शाखांचे आयएफएससी कोड 1 जुलै 2021 पासून बदलणार आहेत. या बदलासोबत सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना एनइएफटी/आरटीजीएस/आयएमपीएस याच्या आधारे पैसे स्विकारण्यासाठी कॅनरा बँकेचा नवीन आयएफएससी कोड वापरावा लागणार आहे.
नवा कोड असा माहिती करुन घ्या
w कॅनरा बँकेने ग्राहकांना युआरएल canarabank.com/IFSC.html च्या आधारे नवीन आयएफसी कोड जाणून घेता येणार असल्याचे म्हटले आहे.
w कॅनरा बँकेच्या संकेतस्थळावरूनही कोड घेता येतो.
w ग्राहकांना आपल्या बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊनही नवा कोड मिळवता येतो.
कॅनरा बँकेने दिलेल्या माहितीनुसार जुन्या सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना आता नवीन चेकबुक मिळणार असून त्यावर आयएफएससी आणि एमआयसीआर कोड राहणार आहे. हा बदल येत्या 1 जुलै 2021 पासून होणार असल्याची माहिती आहे.
2020 मध्ये सिंडिकेटचे कॅनरा बँकेत विलीनीकरण
अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी 2019 रोजी सिंडिकेट बँकेला कॅनरा बँकेत विलीनीकरण करण्याची घोषणा केली होती. हे विलीनीकरण प्रत्यक्षात 1 एप्रिल 2020 रोजी पूर्ण झाले आहे.









