नवी दिल्ली/प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यापासून दिल्लीच्या बाहेर सिंघू सीमेवर (singhu border) शेतकऱ्यांचे आंदोलन (farmers protest) सुरु आहे. आंदोलनाच्या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या मुख्य टेंटच्या जवळील बॅरिकेट्सला एका ३५ वर्षीय व्यक्तीचा हात तोडून मृतदेह बांधला आहे. एका पोलीस बॅरिकेटला हा मृतदेह बॅरिकेट्सला बांधलेला आढळल्यानं खळबळ उडाली आहे. हत्याऱ्यांनी या युवकांची हत्या करून त्याचा मृतदेह संयुक्त किसान मोर्चाच्या (sanyukt kisan morcha) मुख्य टेंटच्या जवळील बॅरिकेट्सला बांधला आहे. त्यामुळे सीमेव तणावाचे वातावरण आहे. या हत्येची जबाबदारी निहंग्या शीखांच्या एका समुहाने घेतली आहे. या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात (supreme court) याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये सिंघू बॉर्डर खाली करण्याची मागणी करण्यात आली आहे.
केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या ९ महिन्यापासून सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. मात्र शुक्रवारी पहाटे सिंघू सीमेवर लखबीर सिंग या तरुणाचा छिन्न-विछिन्न अवस्थेतेत मृतदेह आढळून आला आहे. या तरुणाचे हात आणि पाय कापलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या हत्येप्रकरणी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. या हत्येची जबाबदारी निहंग्या शीखांच्या एका समुहाने घेतली आहे.
लखबीरच्या हत्येप्रकरणी आता शशांक शेखर झा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शुक्रवारी सांयकाळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणी तातडीने सुनावणीची मागणी केली आहे. या याचिकेत त्यांनी सिंघू बॉर्डर लवकरात लवकर रिकामी करण्यात यावी, मागणी केली आहे.