‘रुपे ट्रव्हल टेल्स’ कॅम्पेन अंतर्गत आठ देशांमध्ये ग्लोबल ऑफर सुविधा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रुपे कार्ड सुविधा आता भारतासोबत विदेशातही पोहोचली आहे. त्यामुळे या सुविधेचा आणखीन वापर व विस्तार होण्यासाठी नॅशनल पेमेन्ट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून (एनसीपीआय) ‘रुपे ट्रव्हल टेल्स’ कॅम्पेनच्या अंतर्गत ग्लोबल ऑफर्सची सुविधा सादर केली आहे. ही सुविधा डेबिड आणि क्रेडिट कार्ड धारकांसाठी कॅशबॅकची सुविधा सादर केली आहे. सदरची सुविधा ही अमेरिका, श्रीलंका, ब्रिटन, स्पेन, थायलंड आदी देशांमध्ये सुरु करण्यात आली आहे. रुपे इंटरनॅशनल कार्डवरुन पीओएस व्यवहार करणाऱया ग्राहकांसाठी 40 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक सवलत मिळणार आहे.
कार्ड ऍक्टीव्ह असावे
या सवलतीचा लाभ ग्राहकांना मिळण्यासाठी वरील आठ देशांमध्ये फिरायला जाणाऱया भारतीयांनी भारतीय आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यासाठी रुपे आंतरराष्ट्रीय कार्ड ऍक्टीव्ह करण्याची गरज आहे. यासाठी संबंधित कार्ड धारकांना बँकेसोबत बोलावे लागेल. यात ऍक्टीव्हेशन नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, फोन बँकिंग या ब्रॅन्च बँकिंगच्या आधारे ग्राहक आपले कार्ड ऍक्टीव्ह करु शकणार आहेत.
16 हजारपर्यंत कॅशबॅक?
उपलब्ध सवलतीमधून ग्राहकांना कमीत कमी 100 रुपयांचा व्यवहार करावा लागणार आहे. फक्त एका व्यवहारावर कमीत कमी 4 हजार रुपयापर्यंत कॅशबॅक मिळण्याचा अंदाज आहे. म्हणजे एका महिन्यात ग्राहकांनी चार वेळा या सवलतीचा लाभ घेतल्यास 16 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याचे संकेत आहेत.








