ऑनलाईन टीम / सिंगापूर :
कोरोना विषाणूंच्या संसर्गाने आतापर्यंत जगभरात 52 हजार पेक्षा अधिक जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर सिंगापूर मध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. हे संकट रोखण्यासाठी सिंगापूरचे पंतप्रधान ली सिन लूंग यांनी कठोर उपाय योजले असून, आता सिंगापूर मध्ये एक महिन्याचे लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे.
ली लूंग यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. यावेळी त्यांनी शाळकरी मुलांनाही घरी बसून शिकण्याचे आदेश दिले.
ते म्हणाले, जर आपण पुढील पावले उचलली नाही तर अधिक गंभीर परिस्थिती निर्माण होईल आणि त्यावेळी आपण काहीच करू शकणार नाही. त्यामुळे या संकटाला रिकण्यासाठी टपप्याटप्प्याने नाही तर आता लगेचच कठोर पावले उचलण्याची गरज आहे. त्यामुळे ली यांनी जीवनावश्यक वस्तू, बाजारपेठ, रुग्णालये, वाहतूक व बँक वगळता सर्व कामाची ठिकाणे बंद करण्यात येत असल्याची घोषणा केली.
दरम्यान, सिंगापूर मध्ये आतापर्यंत कोरोनाचे एक हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे









