मुंबई
उदयपूर येथील कंपनी साह पॉलिमरच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद लाभला असल्याचे समजते. सदरचा इशु बोली लावायच्या शेवटच्या दिवशी 8.97 पट सबस्क्राइब झाल्याचे सांगण्यात येते. रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांनी 25 पट, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 13 पट आणि मान्यताप्राप्त संस्थात्मक खरेदीदारांनी 1.06 पट आयपीओ सबस्क्राइब केल्याचे कळते. इशुची किंमत 61 ते 65 रुपयांच्या घरात असणार आहे.









