प्रतिनिधी/कोल्हापूर
छत्रपती राजाराम स़ाखर कारखान्याच्या अपात्र सभासद संर्दभात शुक्रवारी साखर सहसंचालक कार्यालयासामोर सुनावणी दरम्यान अपात्र शेतकऱयांनी एकच आक्रोश केला. साहेब आम्ही पिढीजात शेतकरी आहोत आमचा हक्क हिरावून घेवू नका अशा शब्दात पोटतिडकीने तळमळ मांडली. गेली 20-30 वर्षापासून आम्ही कारखान्याचे सभासद आहोत, शेतकरी म्हणून ऊस पाठवतो. ही वस्तूस्थीती आकसापोटी काऱखान्याच्या निवडणूक डोळय़ासमोर ठेऊन विरोधकांनी राजकीय सुडबूध्दीने अधिकाऱयाना हाताशी धरून शेतकऱयांना नोटीस पाठवल्या आहेत असा आरोपही शेतकऱयानी केला. दरम्यान मयत सभासदांनी नोटीस स्वीकारलीच कशी हा तांत्रिक मुद्दा उपस्थित झाल्याने पुढील सुनावणी सोमवारी ठेवण्यात आली आहे.
पालकमंत्र्यांच्या तक्रारीला भिक घालणार नाही- चेअरमन सर्जेराव माने
तत्पूर्वी खाटीक समाज हॉल येथे झालेल्या शेतकऱयांच्या मेळाव्यात माजी आमदार कारखान्याचे संचालक अमल महाडिक यांनी सडकून टीका केली. चेअरमन सर्जेराव माने म्हणाले, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना हा सर्वसामान्य शेतकरी सभासदांचा आहे. त्यामुळे तो अबाधित राखण्यासाठी तुमची फक्त साथ व सहकार्य अपेक्षित आहे. कसबा बावडा गावातील सुमारे 51 हजार टन ऊस पुरवठा राजाराम कारखान्यास होत आहे. त्यामुळे त्यांचा माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या कुशल प्रशासनावर विश्वास आहे. पलाकमंत्र्यांच्या खोटय़ा तक्रारीला कोणही शेतकरी भिक घालणारे नाहीत. महाडिक रडणारे नाहीत तर लढणारे आहेत. त्यांनी निवडणूकीसाठी समोरासमोर यावे. आमची तयारी आहे. अशा शब्दात चेअरमन सर्जेराव माने यांनी टीका केली.
राक्षशी महत्वकांक्षेला गाढू -माजी चेअरमन दिलीप पाटील
कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुंड पाठवून सभा उधळून लावण्याचा उद्योग बावडय़ातील माणूस करत आहे. पण त्याला सभासदांनी थारा दिलेला नाही. बावडय़ातील कारखाना बावडय़ाकडेच राहिला पाहिजे या राक्षसी महत्व कांक्षेने पछाडलेल्या व्यकतीला येत्या निवडणूकीत सुज्ञ शेतकरी सभासद गाढल्याशिवाय राहणार नाहीत. अशा इशारा माजी चेअरमन दिलीप पाटील यांनी दिला.
राज्यमंत्री सतेज पाटील यांनी डी.वाय. पाटील साखर कारखान्याचे चार हजार सभासद एका रात्रीत कमी करुन तो कारखाना खासगीकरण केला आहे. त्याच पध्दतीने राजाराम कारखाना ताब्यात घेण्यासाठी त्यांचा केवीलवाना प्रयत्न सुरू आहे. तो 122 गावातील सभासद यशस्वी होऊ देणार नाहीत. असा सज्जड इशारा तानाजी पाटील यांच्यासह शेतकऱयांनी दिला. मंत्री सतेज पाटील यांच्या बगलबच्यांनी कारखान्याच्या वयोवृध्द सभासदांना चौकशीची खोटी तक्रार दाखल करुन नोटीस बजावली आहे. यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच त्यांचा सभासदाचा हक्क हिरावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण कारखाना संचालक मंडळ व प्रशासन सभासदांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे विरोधकांचा हा डाव उधळून लावला जाईल. अशी ठाम भूमिकाही शेतकऱयांनी मांडली मेळाव्यानंतर शेतकऱयांनी साखर सहसंचालक अरुण काकडे यांची भेट घेतली. यावेळी शिवाजी पाटील, दिलीप उलपे. सुरेशराव पाटील, सर्जेराव भंडारी, बाबासाहेब कांबळे, वसंत बेनाडी, अरुण गायकवाड, बाळकृष्ण बोराडे. विजय पाटील, बाळासाहेब थोरवत, सुरेश कांबरे, अरुण माळी यांचेसह अन्यायग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
कोणावर अन्याय होणार नाही.- अरुण काकडे
कायदा सर्वांना समान आहे. कायद्यासमोर कोणही मोठे नाही. उच्च न्यायालयाने दिलेले आदेश. कारखान्याचा पोट नियम तपासून कायदेशीर न्याय दिला जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही. असे आश्वासन साखर हस संचालक अरुण काकडे यांनी शेतकऱयांसमोर बोलताना दिले.