मुंबई \ ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या बैठकीत राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता देण्यात आली आहे. या पर्यटनाबाबत लवकरच नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
या पर्यटनाबाबतचा शासन निर्णय लवकरच जारी करण्यात येणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील साहसी पर्यटनाच्या धोरणाला मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये साहसी पर्यटनावर नियमावली जारी करण्यात येणार आहे. काळजी घेऊन पर्यटनाबाबत विचार करत असल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. लवकरच नियमावली जारी करण्यात येणार आहे. यामध्ये स्पोर्टस, गिर्यारोहक पर्यटनाचा समावेश करण्यात आला नसून केवळ टुरिझममध्ये ट्रेक,स्कुबा ड्रायव्हिंगसाठी गेल्यास काही नियमावलीचं पालन करावे लागणार आहे.
राज्यात पर्यटनामध्ये शिथिलता देण्यात आली नाही. राज्यातील नागरिकांचा जीव वाचवणे यावर प्राथमिकता प्राधान्य दिलं आहे. मागील वर्षापासून पर्यटन खातं उपाययोजना करत आहे. जेव्हा महाराष्ट्रात कोरोना संपेल तेव्हा पर्यटनाला उभारी मिळण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना सुरु केल्या आहेत. महाराष्ट्रात पर्यटन वाढवण्यासाठी पाउलं उचलण्यात येत आहेत. कोरोना संपल्यानंतर महाराष्ट्र अग्रेसर कसा राहील याबाबत राज्य सरकार काम करत आहे. अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
Previous Articleमहाराष्ट्रात उद्यापासून कोरोनामुक्त भागात वाजणार शाळेची घंटा
Next Article अमेरिकेसोबत लवकरच संरक्षण साहित्य खरेदी करार








