प्रतिनिधी /वास्को
सासमोळे बायणा वास्को येथील श्री गोमंतेश्वर देवस्थानचा 11 वा वर्धापनदिन सोळा व महाशिवरात्री उत्सव दि. 24 फेब्रुवारी ते दि. 2 मार्चपर्यंत विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात येणार आहे.
आज गुरूवार दि. 24 रोजी सकाळी 8 वा. यजमान सौ. व श्री. दिनेश शेट गांवकर यांच्याहस्ते धार्मिक विधी, प्रथम यजमानास प्रायश्चित, गणपती पूजन, देवता प्रार्थना, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, आचार्य वर्णन, संभारदान, स्थळ शुद्धी, प्रकारशुद्धी, देवता स्थापना, अथर्वशिर्ष लघुरूद्र अभिषेक, सग्रह मुख, रूद्र स्वाहाकार, परिवार देवता हवन, बलिदान, पुर्णाहुती, अभिषेक, महापूजा, महाआरती, ब्राह्मण संतर्पण व तीर्थप्रसाद, सायंकाळी 6 वा. श्री साई भजनी मंडळ (सांकवाळ) यांचा भजनाचा कार्यक्रम, तद्नंतर 7 वा. मंदिरातून पालखी मिरवणुकीला सुरवात होईल. त्यानंतर आरती, तीर्थप्रसाद व पावणी.
शुक्रवार दि. 25 रोजी सकाळी धार्मिक विधी, सायंकाळी 4 वा. महिलांसाठी हळदीकुंकू. शनिवार दि. 26 रोजी सकाळी धार्मिक विधी, सायंकाळी 5 वा. यजमान सौ. व श्री. उल्हास आरोलकर यांच्याहस्ते प्रतिवार्षिक पद्धतीप्रमाणे 83 वी श्री सत्यनारायण महापूजा, तद्नंतर भजनाचा कार्यक्रम. रविवार दि. 27 रोजी सायंकाळी 6.30 वा. स्वराज नाईक् पुरस्कृत ‘तीन फुल एक हाफ’ कोकणी नाटक. सोमवार दि. 28 रोजी सायंकाळी 4 वा. रांगोळी स्पर्धा. मंगळवार दि. 1 मार्च रोजी पहाटेल 5.30 वा. सौ. व श्री. आत्माराम अनंत धुरी यांच्याहस्ते महाअभिषेक, दुपारी 1 वा. आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी 7 वा. भजन, रात्री 9 वा. मंदिराभोवती पालखी मिरवणूक, तद्नंतर पावणी, आरती व तीर्थप्रसाद. बुधवार दि. 2 रोजी सकाळी 9 वा. यजमान सौ. व श्री. संतोष तारी यांच्याहस्ते लघुरूद्र, सायंकाळी 5 वा. भजन, 6.30 वा. ‘एकेरी नृत्य स्पर्धा’ होऊन उत्सवाची सांगता होईल.









