सहा दिवस भरगच्च धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिनिधी / म्हापसा
सावळे – पिळर्ण, बार्देश येथील श्री महारुद्र आम्रेकरनाथ देवस्थानाचा 10 वा वर्धापनदिन दि. 6 ते 11 मार्च दरम्यान विविध धार्मिक तसेच भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
शनिवार 6 रोजी सकाळी 8 वा. धार्मिक विधींना सुरुवात, वर्धापनदिनाचे यजमान ः सौ. व श्री. गणेश पेडणेकर, सौ. व श्री. संदेश पेडणेकर, सो. व श्री. साईनाथ नागवेकर, सौ. व श्री. दिवाकर पेडणेकर, सौ. व श्री. परेश सावळेकर हे असणार आहेत. दुपारी 1 वा. पासून महाप्रसाद होईल. रात्री 9 वा. पालखी मिरवणूक व दिवजोत्सव होणार आहे.
रविवार दि. 7 रोजी सकाळी 8 वा. नित्यपूजा, आरती, सायं. 7 वा. अखिल गोवा नृत्य स्पर्धा (5 ते 12 वर्षांपर्यंत मर्यादित) घेण्यात येईल.
सोमवार 8 रोजी सकाळी नित्यपूजा, आरती, सायं. 7 वा. आमंत्रित पुरुष भजनी मंडळांची स्पर्धा होईल.
मंगळवार 9 रोजी सकाळी 8 वा. नित्यपूजा, आरती, सायं. 7 वा. ह. भ. प. गुरुदास सुतार (खिडकी – सत्तरी) यांचे कीर्तन होणार असून संगीतसाथ विठ्ठल खांडोळकर व पुंडलिक कळंगुटकर हे करणार आहेत.
बुधवार 10 रोजी सकाळी 8 वा. नित्यपूजा, आरती व सायं. 7 वा. श्री चामुंडेश्वरी प्रसन्न वैभवी क्रिएशन्स डिचोली निर्मित आणि अमर फाळकर प्रस्तुत ‘अशी ही बनवाबनवी’ सादर होणार आहे. गुरुवार 11 रोजी महाशिवरात्री साजरी करण्यात येईल. पुजेचे यजमानपद सौ. व श्री. रोहन दि. नागवेकर असतील. पहाटे 4.30 ते सायं. 6 वा.पर्यंत महाशिवरात्री दिवशी सर्व भक्तगणांना गर्भकुडीत अभिषेक करण्यासाठी प्रवेश देण्यात येईल. सायं. 7 वा. श्री गुरुकृपा संगीत संस्था तांबोसे – पेडणे प्रस्तुत संगीत नाटक ‘मंदार – माला’ सादर होईल. या सहाही दिवसांच्या संपूर्ण कार्यक्रमाचे पुरस्कर्ते उद्योजक तथा समाजसेवक देवानंद अर्जुन नाईक हे आहेत. भाविकांनी तीर्थप्रसादाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री आमेकरनाथ देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.









