वार्ताहर / माले
बच्चे सावर्डे मांगले दरम्यान धरणाजवळ सावर्डे खुर्द तालुका शाहूवाडी येथील हौसाबाई शामराव पाटील वय 70 वर्षे यांचा मृतदेह आढळून आला शुक्रवार तारीख 28 ऑगस्ट रोजी दुपारी पाऊस उघडल्यानंतर हौसाबाई पाटील शेतात जातो म्हणून सांगून घरातून बाहेर पडल्या परंतु रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्यामुळे त्यांची शोध सुरू केला त्या न सापडल्याने शनिवारी दिनांक 29 रोजी शाहूवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.
नदीकाठावर त्यांच्या चपला आढळल्याने नदी शेजारी शोध घेण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसापासून नदीपात्रातून सवते सावर्डे पासून बोटीच्या सहाय्याने शोध घेतला दरम्यान सावर्डे मांगले धरणाच्या दाऱ्याजवळ लाकडाच्या ओंडक्याला अडकलेल्या मृतदेहाची माहिती बच्चे सावर्डेेचे पोलीस पाटील सागर यादव यांना समजली.
तोपर्यंत नदीपात्रात बोटीच्या साहाय्याने शोध घेत असलेल्या नातेवाईकांना मृतदेह नदीपात्रात आढकल्याचे समजले कोडोली पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला मृतदेहाचे ओळख पटल्यानंतर बोरपाडळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अधिक तपास कोडोली पोलिस ठाण्याचे नामदेव सुतार व प्रदीप यादव करत आहेत घटनास्थळी सावर्डे खुर्दचे पोलीस पाटील भीमराव पाटील बच्चे या वेळी सावर्डेचे पोलीस पाटील सागर यादव दोन्ही गावचे ग्रामस्थ नातेवाईक उपस्थित होते.
Previous Articleस्पाइसजेटचा पोर्टेबल व्हेंटिलेटर सादर
Next Article वर्क फ्रॉम होम मोहिमेतून होतेय बचत









