प्रतिनिधी / मणेराजूरी
सावर्डे ता. तासगांव येथील वनविभागाच्या जागेत असलेले घर सांगली व तासगाव वनविभागाने संयुक्त रित्या कारवाई करत जमीनदोस्त केले. यावेळी अधिकारी व पारधी यांच्यात राडा झाला. मोबाईल हिसकावून घेत शिवीगाळ व दमदाटी केली. यावेळी झालेल्या मारहाणीत रेखा जगणू पवार ही महिला गंभीर जखमी झाली. अधिकाऱ्यांनी माझ्या डोक्यात काठी मारून जखमी केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. हा प्रकार शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडला.
काही दिवसा पूर्वी सावर्डे येथील वनविभागाच्या हद्दीत असलेले जगणू पवार या पारधी कुंटूबाचे झोपडीवजा असलेले घर अज्ञातांनी जाळले होते. यानंतर यांना आरपीआय व समाजातील इतरांच्याकडूनच्या मदतीने पत्रे वजा घर उभारण्याचे काम सुरू होते ;शुक्रवारी सकाळी वन विभागाने आमच्या हद्दीत आहे. म्हणून हे घरच जमीनदोस्त करून जप्त करून कारवाई केली आहे.यातच हा राडा झाला.
यावेळी जखमी महिला रेखा पवार यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून आम्ही सावर्डे येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने वनविभागाच्या जागेत राहतो. पंधरा दिवसांपूर्वी आमचे झोपडीवजा घर कुणीतरी जाळून टाकले. यानंतर आरपीआय पक्षाकडून सिमेंटचे पक्के घर बांधून दिले जात होते. गुरुवारी पत्रे मारले जात होते.
शुक्रवारी सकाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घराची मोडतोड करून साहित्य जप्त केले. यावेळी जोरदार राडा झाला. यावेळी रेखा पवार यांच्या डोक्यात काठीने माऱल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. तसेच महिला व मुलांनाही मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला. तर वनविभागाकडून अद्याप तरी याचा कोणताही खुलासा आला नाही ;या विभागाचे तासगाव कार्यालय बंद आहे .
धनदांडग्यांच्या अतिक्रमणाच काय..
तासगाव तालुक्यात वनविभागाच्या अनेक ठिकाणी जागांवर अतिक्रमण आहे. लोकांनी त्यांच्या जागा बळकावून सिमेंटची घरे, शेततळी, विहिरी व शेती करायला सुरुवात केली आहे. मात्र ही अतिक्रमणे अद्याप काढण्याचं धाडस वन विभागात नाही. पारध्यांच अतिक्रमण काढलं तस बाकीच्या धनदांडग्यांची अतिक्रमण न काढल्यास व पारध्यांना तेंचा हक्क न दिल्यास संघर्ष अटळ असून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा आरपीआय लोकसभा क्षेत्र अध्यक्ष संदेश भंडारे यांनी दिला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








