प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यात बाधितांचा आकडा वाढत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 49 हजार 566 एवढे बाधित झाले आहेत. रात्री उशिराच्या अहवालानुसार सातारा तालुका बाधित आणि मृत यांच्या प्रमाणात पुढेच आहे. दोन दिवसांपूर्वी सातारच्या जंबो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले सीआरपीएफचे बोरखळ येथील जवान दीपक रसाळ यांचा दुदैवाने मृत्यू झाला.
सातारा तालुक्यात वाढ सुरूच
सातारा जिल्ह्यातील कोरोना संसर्ग कमी होतोय. गेल्या 20 दिवसात आकडा कमी दिसू लागला होता. तो पुन्हा गेल्या दोन दिवसात आकडा हळूहळू वाढत चालला आहे. त्यात सातारा तालुका 34, कराड तालुक्यातील 14, पाटण तालुक्यातील 7, फलटण तालुक्यातील 16, खटाव तालुक्यातील 13, माण तालुक्यातील 8, कोरेगाव तालुक्यातील 26, जावली तालुका 7, वाई तालुका 6, खंडाळा 20, महाबळेश्वर 6 असे बाधित आढळून आले. दोन दिवसांपूर्वी सातारा तालुक्यातील बोरखळ येथील सीआरपीएफचे जवान दीपक रसाळ यांना कोरोना झाल्याने ते स्वतः जंबो हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यांचा दोन दिवसांपूर्वी उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्यांच्यावर काल संगममाहुलीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
162 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित
सातारा तालुक्यातील-34
सातारा 6, मंगळवार पेठ 1, करंजे 2, शाहुपूरी 1, मोळाचा ओढा 2, शिवथर 4, गजवडी 1, खिंडवाडी 1, जकातवाडी 1, वर्ये 1, नागठाणे 1, विलासपूर 1, सदरबझार 1, परळी 1, चिंचणेर 1, विकासनगर 2, किडगांव 1, गोळीबार मैदान 1, गडकर आळी 2, पाटखळमाथा 1, एमआयडीसी 1,गेंडामाळ 1.
कराड तालुक्यातील-14
मंगळवार पेठ 2, येणके 1, हेलगांव 1, कोळे 1, विंग 5, कार्वे 1, रेठरे 1, वाठार 2.
पाटण तालुक्यातील-7
उरुल 1, बहुले 1,कोंजवडे 1, कालगाव 1, अबदरवाडी 1, रामीश्तेवाडी 1, ढेबेवाडी 1.
फलटण तालुक्यातील-16
फलटण 3, पिराचीवाडी 1, साखरवाडी 2, रिटेवस्ती कुंटे 1, गुणवरे 1,शेरेचेवाडी 2, बिरदेवनगर 1, पद्मावती नगर 1, सांगवी 1, वाखरी 1, निमगांव 1, वाघोशी 1.
खटाव तालुक्यातील-13
खटाव 2, वडुज 2, अंबवडे 1, दारुज 4, औंध 1, जाखणगांव 1, सिध्देश्वर 1, जाखणगांव 1.
माण तालुक्यातील-8
दहीवडी 1, तुपेवाडी 1, पर्यंती 1, वावरहिरे 1,बिदल 2, म्हसवड 1, वरकुटे मलवडी 1.
कोरेगाव तालुक्यातील-26
कोरेगांव 1, तडवळे 1, बिचुकले 3, वाठार स्टेशन 2, विखळे 2, शिरढोण 1, रहिमतपुर 7, भाडळे 1, एकसळ 1, वाठार किरोली 3, सुरली 3, अंभेरी 1.
जावली तालुक्यातील-7
जावली 1, हातगेघर 1, नरफदेव 1, कुडाळ 2, केळघर 1, सांगवी 1.
वाई तालुक्यातील-6
वाई 1, कवठे 1, वाशीवली 1,सह्याद्रीनगर 1, मोतीबाग 1, सोनगिरवाडी 1.
खंडाळा तालुक्यातील-20
शिरवळ 1, बावडा 2, भादे 1, पारगांव 3, लोणंद 8, निंबोडी 4, लोहम 1.
महाबळेश्वर तालुक्यातील-6
महाबळेश्वर 1, पाचगणी 2, भिलार 1, मॅप्रो गार्डन 1, तळदेव 1
इतर-4
माणेगांव 1, केंजळ 1,
बाहेरील जिल्ह्यातील भाळवणी 1, कमळावाडी (वाळवा) 1, पुणे 1.
8 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये चिंचणेर ता. सातारा येथील 76 वर्षीय पुरुष, मलवडे ता. माण येथील 80 वर्षीय महिला, कासारशिरंबे ता. कराड येथील 52 वर्षीय पुरुष, उडतारे ता. वाई येथील 65 वर्षीय पुरुष. जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटमध्ये संभाजीनगर ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, ताडदेव मुंबई येथील 78 वर्षीय परुष, पुसेगांव ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुष तसेच रात्री उशीरा कळविलेले कराड येथील 58 वर्षीय पुरुष अशा एकूण 8 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
शनिवारपर्यंत
एकूण नमुने -2,29,400
एकूण बाधित -49,566
घरी सोडण्यात आलेले -46,821
मृत्यू -1,678
उपचारार्थ रुग्ण-1,067