प्रतिनिधी / वाटेगाव
कोरोना काळात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढताना दिसून येत आहेत. जर तुमच्या मित्राने सोशल मिडियातील मेसेंजर माध्यमातून पैसे उसने मागितले तर पाठवू नका कारण तुमची फसवणूक होऊ शकते. प्रत्यक्ष संवाद साधूनच पैसे पाठवा. कारण ऑनलाइन फसवणुकीचे नवनवीन फंडे हॅकर शोधून काढत आहेत.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात
एका सधन गावामध्ये डिजिटल व्यावसायिकाला त्याच्या गडहिंग्लजच्या मुंबईस्थित मित्राने सोशल मिडिया मेसेंजरच्या माध्यमातून दहा हजार रुपये उसने तातडीने देण्याची विनंती केली. सुरवातीला मराठमोळा मित्र हिंदीत पैशांची मागणी करत होता परंतु डिजिटल व्यावसायिकाला तो मित्र मुंबईमध्ये राहत असल्याने कसलाही संशय आला नाही. तसेच दुसऱ्या दिवशी काहीतरी व्यवस्था करून पैसे देण्याची तयारी दाखवली. मात्र संपूर्ण संभाषण मित्र हिंदीतच करत असल्याने डिजिटल व्यावसायिकाला थोडा संशय आला. त्याने थेट मित्राला फोन केला व पैसे का लागणार आहेत, अशी विचारणा केली. तर धक्कादायक महिती समोर आली. वास्तविक मुंबईस्थित मित्राचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाले आहे. व त्यावरून हॅकरने अनेक लोकांना पैशांची मागणी केली होती. काहींनी तर पैसेही पाठवले होते. असा उलगडा झाल्यावर डिजिटल व्यावसायिकाला धक्काच बसला. खात्री न करता पैसे पाठवले असते तर आपलीही आर्थिक फसवणूक झाली असती असे त्याच्या ध्यानात आले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








