ऑनलाईन टीम / मॉस्को :
पक्षांमधील ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग आता माणसालाही होऊ लागला आहे. रशियात एका पोल्ट्री फार्ममध्ये काम करणार्या सात कामगारांना बर्ड फ्लूची लागण झाली असून, अशा प्रकारची जगातील ही पहिलीच घटना आहे. जागतिक आरोग्य संघटनेला यासंदर्भात कळविण्यात आल्याचे ग्राहक आरोग्य वॉचडॉक रोस्पोट्रेबनाडझोरच्या प्रमुख ॲना पोपोवा यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितले.
पोपोवा म्हणाल्या, वेगवेगळ्या देशात स्थलांतर करणार्या पक्षांमुळे रशियात बर्ड फ्लूचा प्रसार वेगाने होत होता. डिसेंबरमध्ये या रोगाचा उद्रेक झाला. पोल्ट्रीतील कोंबडय़ांना बर्ड फ्लूची लागण होत होती. मात्र, पहिल्यांदाच कोंबडय़ांमधील या रोगाचा संसर्ग माणसाला झाला. माणसांना या रोगाचा संसर्ग होण्याचा धोका नसला तरी देखील बर्ड फ्लूने संक्रमित जिवंत आणि मृत कोंबडय़ांच्या थेट संपर्कात आल्याने संसर्ग होण्याची शक्यता असते. मात्र, व्यवस्थितपणे शिजवून खालेलं अन्न सुरक्षित आहे, असेही त्यांनी सांगितले.