वार्ताहर / उचगाव :
सावगाव येथील ओमकार को-ऑप. पेडिट सोसायटीतर्फे गावातील आशा कार्यकर्त्या, डॉक्टर्स या कोरोना योद्धय़ांचा सत्कार, मास्क वितरण आणि चीनच्या सीमेवरील हुतात्म्यांना श्रद्धांजली असा संयुक्त कार्यक्रम पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष के. वाय. घाटेगस्ती होते.
यावेळी आरोग्य अधिकारी आर. एन. नरगुंद, आशा कार्यकर्त्या, कल्पना घाटेगस्ती, मनीषा हिंडलगेकर, सुरेखा कांबळे, अंगणवाडी शिक्षिका संजुलता सटवाई, वंदना कदम, रेखा चौगुले, रेणुका कांबळे, रेखा बेळगावकर यांचा शाल, श्रीफळ देऊन प्रेमा मोरे, निशा काकतकर यांच्या हस्ते सत्कार केला.
मास्कचे वितरण
यावेळी दीडशे मास्कचे वितरण विविध मान्यवरांनी केले. आरोग्य अधिकारी आर. एन. नरगुंद यांनी कोरोनापासून बचावासाठी कोणते उपाय, खबरदारी घ्यावी, याबाबत माहिती दिली. नारायण कडलीकर यांनीही उपयुक्त माहिती दिली.
स्वागत संचालक मनोहर कदम यांनी केले. सूत्रसंचालन संस्थेचे कार्यदर्शी राजू कदम यांनी करून आभार मानले.









