सावंतवाडी / प्रतिनिधी-
सावंतवाडी- माजगांव येथील एलआयसी कंपनीचे एजंट तसेच ईलेक्ट्रीक दुचाकी गाड्यांचे वितरक गोविंद घळसाशी (वय 50) यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने माजगांवसह सावंतवाडीत हळहळ व्यक्त होत आहे. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात ते कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.









