सावंतवाडी / वार्ताहर:
सावंतवाडी नगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत माझी वसुंधरा अभियान हरित शप्पथ व्यापारी व नागरिकांना देण्यात आली. आझादी का अमृत महोत्सव या निमित्ताने सावंतवाडी शहरातील भाजी मार्केट व प्रत्येक प्रभागात पर्यावरण बचाव आणि स्वच्छता याविषयी जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. माझी वसुंधरा अभियानात सावंतवाडी शहर एक आदर्शवत शहर बनावे, यासाठी सावंतवाडी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने उपक्रम हाती घेतले आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ सावंतवाडी मच्छी व भाजी मार्केटमध्ये करण्यात आला. आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, माजी आरोग्य सभापती आनंद नेवगी, अनारोजीन लोबो, दीपाली सावंत, दीपाली भालेकर, सुरेंद्र बांदेकर उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर, आरोग्य निरीक्षक पांडुरंग नाटेकर, रसिका नाडकर्णी, देविदास आडारकर उपस्थित होते. यावेळी स्वच्छता दूत कर्मचाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये जयवंत जाधव, मोहन कांबळे, गणेश खोरागडे, बबन जाधव, शोभा खोब्रागडे, युवराज मेहतर, रमेश कदम, रेश्मा मेहत्तर आदींचा गौरव करण्यात आला.
Previous Articleमहावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर
Next Article भाजपने मला टार्गेट करायचं ठरवलयं : मंत्री मुश्रीफ









