100 हून अधिक खांब पडले
वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी तालुक्यात वीज वितरण कंपनीचे शहरासह तालुक्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. वीज वितरणची टीम सोमवारी दिवसभर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत होती. तालुक्यातील सुमारे 100 हून अधिक वीजखांब आणि वापर तुटून पडल्या. वीजपुरवठा पूर्वपदावर येण्यास दोन दिवस लागतील, असे वीज वितरणकडून सांगण्यात आले.
शहरासह तालुक्यात झाडे आणि फांद्या पडून खांब तुटून पडले. त्यामुळे ते पुन्हा उभारण्यासाठी 50 हून अधिक वीज कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. संपूर्ण तालुक्यातील वीजपुरवठा खंडित आहे. नवीन ट्रान्सफॉर्मवर सावंतवाडीत बसविण्यात येणार आहे. त्यातून शहराला वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.
दूरध्वनी यंत्रणा कोलमडली
वादळात तालुक्यातील दूरध्वनी यंत्रणेचे मोठे नुकसान झाले. इंटरनेट सेवाही खंडित झाली होती. दूरध्वनीचे खांब, टॉवरचे काम करण्यात येत आहे. इंटरनेट, मोबाईल सेवा खंडित झाल्याने नागरिकांचा संपर्क तुटला होता. ही यंत्रणा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते.









