ओटवणे / प्रतिनिधी:
सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी क्राँग्रेसच्यावतीने ओटवणे, सरमळे, विलवडे गावातील पुरग्रस्तांना धान्य व ताडपत्री वितरण करण्यात आले. सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी क्राँग्रेस अध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आपल्या पदाधिकारी समवेत पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरग्रस्तांना धीर दिला.
यावेळी राष्ट्रवादी क्राँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नियाज शेख, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेकार राजगुरु, जिल्हा युवक उपाध्यक्ष हर्षद बेग, शहर अध्यक्ष देवेंद्र टेंमकर, सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष शैलेश लाड, महीला जिल्हा व्यापार उद्योग अध्यक्षा दर्शना बाबरदेसाई, अस्लम खतिब, संतोष जोईल आदि उपस्थित होते.
यावेळी पुंडलिक दळवी यांनी पूरग्रस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी पूरग्रस्तांना जास्तीत नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन श्री दळवी यांनी पूरग्रस्तांना दिले. यावेळी बांदा व शेर्ले कापईवाडी येथील पूरग्रस्तांनाही पुंडलिक दळवी यांनी ताडपत्री वितरण केले.
Previous Articleपरमबीर सिंह यांच्यावरील गुन्ह्याच्या तपासासाठी SIT ची नेमणूक
Next Article सांगली : वारणा धरणात 31.38 टीएमसी पाणीसाठा









