अध्यक्षपदी विलास परब उपाध्यक्षपदी दादा कोनसकर सचिवपदी संदीप कोनसकर
ओटवणे / प्रतिनिधी:
सिंधुदुर्ग जिल्हा बहुउद्देशीय दशावतारी कलाकार संघाचे अध्यक्ष बाळू कोचरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सावंतवाडी तालुक्यातील सर्व दशावतारी कलाकारांच्या बैठकीत सावंतवाडी तालुका बहुउद्देशीय दशावतारी कलाकार संघाची स्थापना करण्यात आली. या बैठकीत सावंतवाडी तालुका बहुउद्देशीय दशावतारी कलाकार संघाच्या अध्यक्षपदी विलास परब, उपाध्यक्षपदी दादा कोनसकर, सचिवपदी संदीप कोनसकर, खजिनदार बाबा सावंत, सल्लागार संतोष रेडकर, मुकुंद परब तर तालुका कार्यकारणीवर सदस्य म्हणून मयुर गवळी, आपा कामतेकर बंटी कांबळी, संदीप तळवडेकर, किशोर गवस, उदय कोनसकर, नारायण आशयेकर, तात्या स्वार, प्रशांत मयेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. या बैठकीला सावंतवाडी तालुक्यातील सुमारे १५० दशावतारी कलाकार उपस्थित होते.
सावंतवाडी तालुक्यातील सर्व दशावतारी कलाकारांना संघटीत करून या कलावंतांना येणाऱ्या अडचणी दूर करणे, शासन दरबारी या कलाकारांना योग्य न्याय देऊन या कलाकारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे या उद्देशाने या सावंतवाडी तालुका बहुउद्देशीय दशावतारी कलाकार संघाची स्थापना करण्यात आल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा बहुउद्देशीय दशावतारी कलाकार संघाचे अध्यक्ष बाळू कोचरेकर यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्हा बहुउद्देशीय दशावतारी कलाकार संघाच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी तालुका बहुउद्देशीय दशावतारी कलाकार संघ कार्यरत राहणार असल्याचे अध्यक्ष विलास परब, उपाध्यक्ष दादा कोनसकर, सचिव संदीप कोनसकर यांनी सांगितले.









