सावंतवाडी/प्रतिनिधी –
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सावंतवाडी आयोजित व स्व. दशरथ दत्ताराम गोडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ गोडकर कुटुंबीय पुरस्कृत सावंतवाडी तालुका स्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यात इयत्ता पाचवीसाठी चराठे शाळा नंबर 1 चा कु.सोहम बापूशेट कोरगावकर 264/300 गुण मिळवून प्रथम , कास नंबर 1 चा कु.अथर्व राजन पंडित 252 गुण मिळवून दुसरा तर कु.पारस देवदास दळवी सवारवाड 242 गुणांसह तृतीय क्रमांक पटकवला आहे. इयत्ता आठवीसाठी मळगाव हायस्कूलची कु.समृद्धी कृष्णा गवस हिने 238 गुण मिळवून प्रथम क्रमांक, कु.यज्ञेश येशवंत सावंत -222 गुण मिळवून दुसरा तर कु.धनाक्षी रांगणेकर 216 गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकवला आहे. हे दोन्ही विद्यार्थी कळसुळकर इंग्लिश स्कूलचे आहेत .हि परीक्षा 25 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील सर्व केंद्रात घेण्यात आली होती. परीक्षेला उत्तम प्रतिसाद मिळाला .या सर्व विध्यार्थ्यांना दशरथ गोडकर यांच्या जन्मदिनी (एक एप्रिल रोजी) रोख रक्कम व स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती सराव परीक्षा आणि त्याचा निकाल तयार करण्यासाठी ,अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने विशेष परिश्रम घेतले त्यांचे गोडकर कुटुंबियांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.









