वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी उपजिल्हा रुगणालयात मंगळवारी 75 आरोग्य कर्मचाऱयांना कोरोना लस देण्यात आली. शनिवारी 16 जानेवारीला या लसीचा शुभारंभ झाला होता. आता पुन्हा मंगळवारी 75 जणांनी लस घेतली. तालुक्यात एकूण 150 जणांनी लस घेतली आहे. तालुक्यात जवळपास 400 आरोग्य कर्मचारी, अधिकारी आहेत. सिंधुदुर्गात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक आरोग्य कर्मचाऱयांनी लस घेतली. 28 दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम पाटील यांनी दिली.









