सावंतवाडी/ प्रतिनिधी-
सावंतवाडीतील रस्ता डांबरीकरण, सुवर्ण काॅलनी जागा विकसित करणे, पाजंरवाडा पुल करणे, सालईवाडा संरक्षक भिंत आदी विकास कामांची भूमिपूजन शुक्रवारी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी खासदार विनायक राउत, आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष संजु परब, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक जयेंद्र परुळेकर, राजू बेग, अनारोजिन लोबो, बाबु कुडतरकर, आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, शुभांगी सुकी, उत्कर्षा सासोलकर, शिवसेना जिल्हप्रमुख संजय पडते, रुपेश राउळ, आदी उपस्थित होते.









