एकूण ४३ प्रकारच्या रानभाज्या व वनौषधीचे प्रदर्शन
ओटवणे / प्रतिनिधी:
जिल्हा कृषी अधीक्षक श्री.म्हेत्रे यांच्याहस्ते सावंतवाडी तालुका रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सावंतवाडीचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री. अडसुळे, तालुका कृषी अधिकारी श्रीम. पापडे ,मंडळ कृषी अधिकारी श्री. घाडगे, कृषी पर्यवेक्षक श्री. वाघमारे, तसेच सावंतवाडी मंडळ १, व मंडळ २, बांदा मंडळाचे सर्व कृषी सहायक व पदाधिकारी उपस्थित होते. रानभाज्यांच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रानभाज्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे. ग्रामीण भागाचे आर्थिक सक्षमीकरण रानभाज्यांच्या विक्रीतून होऊ शकते. महिला व बचत गटांना प्रोत्साहन दिल्यास रानभाज्यांचे उत्पादन वाढू शकते. त्यातून रोजगाराचीही निर्मिती होऊ शकते. त्यासाठी रानभाज्यांच्या प्रसार व प्रचाराची गरज आहे. या प्रदर्शनात पाणी, टाकळा, काळी, अळू, मायाळू, कुर्डू, करमळू, रानकेळ, करांदे, पेवा, सुरण, बांबू, कोंब, करटोली, सडेकोटगिरी, माढा, टॅपिओका, ओवा, चिन्तमुनी, बोलायची, घोळ, भारंगी, आगाडा, तुपकाडा, दिंडा, शेवगा, आळिंबी, आंबेहळद, बिक्सा, कणगर, कैद्याच्या शेंगा, कडूचिंच, तिरडा, नागवेल, पानफुटी, रानभेंडी अशा एकूण ४३ प्रकारच्या रानभाज्या व वनौषधी या प्रदर्शनासाठी मांडण्यात आल्या होत्या. या महोत्सवात रानभाजी उपलब्ध करून दिलेल्या शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशिस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.









