प्रतिनिधी/सावंतवाडी
सावंतवाडीत पालिकेतफेॅ श्रीराम वाचन मंदिर समोर सेल्फी पाॅईंट उभारण्यात येणार आहे. यासाठी पालिकेतफेॅ पावणे आठ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. सेल्फी पाॅईंटचा आराखडा बनविण्यात आला आहे. दोन दिवसात काम सुरु होणार असल्याचे नगराध्यक्ष संजु परब यांनी पत्रकार परीषदेत सांगितले, माझी सावंतवाडी असा सेल्फी पाॅईंटची टॅगलाईन असणार आहे. पर्यटक आणि नागरीकांसाठी हा पाईन्ट आकर्षण ठरणार आहे. दोन दिवसात पाॅईंटचे काम सुरु होणार असल्याचे परब यांनी सांगितले. उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर, आनंद नेवगी, सुधीर आडीवरेकर, अजय गोंधावळे उपस्थित होते.









