वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आलेले कोविड सेंटर गेले महिनाभर रुग्ण नसल्याने बंद होते. मात्र, आता या सेंटरमध्ये कोरोना रुग्ण पुन्हा दाखल होऊ लागले आहेत. सध्या कोरोनाचा एक रुग्ण दाखल आहे.
फेब्रुवारी महिन्यात कोरोना काळात जीव धाक्यात घालून काम करणाऱया नर्स, डॉक्टरना जिल्हा आरोग्य विभागाकडून कमी करण्यात आले होते. आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. आरोग्य विभागाने कोविड सेंटर पुन्हा कार्यरत करण्याच्या तसेच कोविड काळात काम केलेल्या नर्स, डॉक्टर यांना पुन्हा सेवेत घेण्याच्या सूचना केल्या आहेत. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर पुन्हा एकदा कार्यरत झाले आहे. जोपर्यंत कोरोनामुक्त जाहीर केला जात नाही, तोपर्यंत तालुक्याचे कोविड सेंटर कायम ठेवावे. त्या सेंटरमधील डॉक्टर, नर्स, कर्मचाऱयांना कायम ठेवावे, अशी मागणी प्रभारी सभापती शीतल राऊळ यांनी केली आहे.
वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम पाटील यांनी सांगितले की, सध्या कोरोना रुग्ण आढळत आहेत. रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे कोरोना सेंटर कार्यरत केले आहे. W









