सावंतवाडी /प्रतिनिधी-
सावंतवाडी तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती या पूरग्रस्तांच्या मदतीला सावंतवाडी शहरातील मुस्लिम बांधव यांनी आपल्या मुताजीमा कमिटी कब्रस्तान ट्रस्टच्या माध्यमातून माडखोल धवडकी विलवडे सरमळे ओटवणे या भागात जवळपास 120 कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तू चे वाटप करून हिंदू-मुस्लीम यांची एकता दाखवून दिली आहे.
सावंतवाडी शहरातील मुस्लिम बांधव नेहमीच अनेक वेळा सामाजिक उपक्रम राबवून एकतेचा संदेश देत आले आहेत. आता पूर्व स्थितीत तर तालुक्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झालेल्या पूरग्रस्त कुटुंबियांना त्याने मदतीचा हात दिला आहे. कब्रस्तान ट्रस्टचे अध्यक्ष तैकिर शेख, उपाध्यक्ष मुजीब शेख यांच्या पुढाकारातून वाटप करण्यात आले. सेक्रेटरी परवेज बेग, खजिनदार सोहेब बेग, कायदेशीर सल्लागारहीद यतुल खान, बासित पडवेकर, अन्वर शहा, बाबासाहेब दुर्गावले, इरफान शेख, सोहेब गणी, जुबेर पडवेकर आदींनी मेहनत घेतली









