सावंतवाडी / प्रतिनिधी:
सावंतवाडी पंचायत समितीच्या. गट विकास अधिकारी श्री रवींद्र. कणसे यांनी आपल्या पदाचा कार्यभार हाती घेतला. यांचे स्वागत जि.पं.च्या महिला बालकल्याण सभापती सौ. श्रर्वाणी गावकर, श्री. प्रितेश राऊळ, प्रभारी गटविकास अधिकारी श्री. वासुदेव नाईक यांनी केले. तब्बल दोन वर्षानंतर सावंतवाडी पंचायत समितीला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी पद मिळाले आहे. सभापती निकिता सावंत व उपसभापती शीतल राऊळ यांनीही नवनिर्वाचित गटविकास अधिकारी यांचे स्वागत केले आहे.









