डिचोली/प्रतिनिधी
डिचोली तालुक्मयातील साळ या गावात दरवषी साजरा होणारा प्रसिध्द गडेउत्सव आज सोम. दि. 29 मार्च पासून सुरू होणार असून या उत्सवासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. साळ गावात भव्य अशी होळी काल रविवारी संध्याकाळी दाखल झाली. रात्री सर्व देवतांच्या साक्षीने होळी महादेव मंदिराच्या समोरील ठराविक रोवल्यानंतर दुसऱया दिवशी या गावातील अदृश्य शक्ती आणि गडेगण यांच्यातील खेळाचा अविष्कार म्हणजेच गडेउत्सव. तीन दिवसीश या उत्सवाला दरवषी मोठय़ा संख्येने भाविकांची गर्दी असते. मात्र यावेळी हा उत्सव कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणी 144 कलमामुळे मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे.
साळ येथील गडेत्सव फारच वेगळा आहे. शिमग्यातील गडेत्सव डिचोली तालुक्मयातील पिळगांव, कुडणे, आमोणा, बोर्डे- डिचोली व साळ येथे उत्सव साजरा होतो. काही ठिकाणी दिवसा, काही ठिकाणी काळय़ाकुट्ट भयाण रात्री, निस्तब्ध पण साळ येथील गडेत्सव सगळय़ात वेगळा, रात्रीचा असलातरी होळी व मंदिर परिसर विजेचा लखलखाट असतो, हजारो भाविकांच्या उपस्थितीत, त्यात जीवनात विश्वास ठेवावाच लागणारे दृश्य म्हणजे वैज्ञानिक जगात अदृश्य शक्तीचा वावर होय. साळ मध्ये मशालीचे, देव देवचाराचे दर्शन घडते. सांगण्याने पटत नाही पण प्रत्यक्षात अनुभव घेतल्यानंतर वर्तमानातून भुत नि भविष्याचा वेध घेऊ लागतो.
उत्सव मर्यादित स्वरूपाचा, सर्वांनी सहकार्य करावे
पण यंदा हा उत्सव कोरोनाच्या सावटाखाली, अनेक प्रतिबंधातून साजरा होतोय. दक्षिण गोव्याप्रमाणे उत्तर गोव्यात जमावबंदी लागू केली आहे. संपूर्ण गोव्यात 144 कलम लागू केल्याने देवस्थानचे अध्यक्ष कालिदास राऊत यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेण्यात आली. यंदाचा गडेत्सव मर्यादित स्वरूपाचा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. धुमासे, कासारपाल, दोडामार्ग मार्गे येणाऱया भाविकांनी रात्री 9.00च्या आत साळ मध्ये प्रवेश करावा असे साळ देवस्थानचे अध्यक्ष कालिदास राऊत व सचिव विशाल परब यांनी प्रसिद्ध केले आहे.
साळ येथील उत्सवाचा शिरोमणी असलेला गडेत्सवहा गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रसिद्ध आहे. हा उत्सव सोमवार दिनांक 29 मार्च ते बुधवार दिनांक 31 मार्च पर्यंत चालणार आहे .उद्यापासून ( ता. 29 ) येथे सुरू होणाऱया गडेत्सवासाठी आज महाराष्ट्रातील दोडामार्ग तालुक्मयातील मणेरी – खालचाबाजार येथील सूरज प्रसादी यांच्या बागायतीतील होळी 60 फूट आंबा झाडांची असून साळ गडे, नागरिक व मणेरी येथील युवकांनी होळी आणण्यासाठी मदत केली.
श्री महादेवाने आरंभ करुन आदिमाया भूमिका देवीकडे त्याची सूत्रे दिली अशी आख्यायिका आहे. 64 जोगणी म्हणजे 64 गडे होत. इथल्या या जागृत देवस्थानची प्रचिती प्रसिद्ध आहे. तिला झेंडूच्या फुलांनी सुशोभित केली जाते. ती परगावातून आणली जाते त्याची लांबी 60 ते 65 फूट असते ती फक्त आंबा फणस किंवा कोकमची असते. रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास ही होळी मिरवणुकीने श्री महादेव दिवस त्यांच्या प्रांगणात आणली जाते नंतर खड्डय़ात उभी केली जाते. पांढरे शुभ्र धोतर पायघोळ आणि कमरेला जाडजुड चामडय़ाचा काळा पट्टा हा गड यांचा पेहराव असतो. या उत्सवाची सुरुवातही होते की सर्वप्रथम रात्री आठच्या सुमारास श्री सिद्धेश्वर मंदिराकडून ढोल ताशे वाजवत ही मांडवेश्वर देवाचा जयघोष करीत येतात हे दोन ते तीन तास घेऊन उभ्या केलेल्या होळीपाशी येऊन रोमट विसर्जित होते. भाविक ग्रामस्थ आपापले पुरोहिताकरवी गाऱहाणे घालतात तर कित्येकजण फलप्राप्ती नंतर नवस फेडतात नंतर गडे पडण्यासाठी गाऱहाणी घालतात त्यात नवीन गडयाची गाऱहाणे घालतात आणि नंतर गडे पडायला सुरुवात होते.
गाडय़ांचा अवसार आल्यानंतर होळीला पाच फेऱया मारतात ने डोंगराच्या पलीकडे श्री करयेश्वर क्षेत्राकडे करूल्या आणण्यासाठी जातात वाटेवर देवचार गडयांच्या स्वागतासाठी मशाल घेऊन उभा असतो. मशालीच्या प्रकाश झोतात पांढरे शुभ्र धोतर नेसलेले गडे देवा दुःखाचा डोंगर चढून करूया असलेल्या ठिकाणी जातात ही कधीही देवस्थानच्या जागेवर करूल्या धावू लागतात त्यावेळी तेथील काही देवता लपून ठेवतो आणि काही ना त्याच रात्री, काही ना त्याच रात्री परत करतो. यावेळी हजारोच्या संख्येने भाविक गडय़ांबरोबर धावू लागतात व गावातील काही मंडळी असतात हातात दांडा व एक पाय कातळावर ठेवून नमन म्हटले जाते ते ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी असते.
या खेळाची मर्यादा पहाटे पर्यंत म्हणजे चार साडेचार वाजेपर्यंत असते त्या वेळेतच खेळ आटोपला जातो बाबरेश्वर, घवनाळेश्वर, आम्यानी, काजरेश्वर, पातळोशवर भूमिका मंदिर म्हणजे या ठिकाणी गडे देतात श्री माडयेश्वर आपल्या स्थानावर देतो हे गडे रात्रभर अनवाणी काटय़ाकुटय़ातून फिरतात तरी त्यांच्या पायाला किंचितही ओरखडा नसतो सातव्या दिवशी घोडे मोडणी झाल्यानंतर रात्रीच्या चवाटेश्वर मंदिरात तीर्थ देऊन उत्सवाची सांगता होते.









