प्रतिनिधी /कांदोळी
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बार्देश तालुका महिला गोमंतक भंडारी समाजाच्या वतीने साळगाव गावच्या परिसरामध्ये सुमारे 200 झाडे लावून त्याचे संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी म्हापसा मुनिसिपल काऊन्सिलचे अध्यक्ष शुभांगी वायंगणकर म्हणाल्या की, प्रत्येकानी एक तरी झाड लावून संगोपन करणे आवश्यक आहे. आपल्या आयुष्यात एक मोठी आठवण व ठेवा वृक्षाच्या रुपाने आम्हा सर्वांना आनंद देत राहील असे विचार त्यांनी प्रकट केले. भंडारी समाजाच्या महिला व इतर नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. साळगाव गावच्या परिसरात आंबा, फणस, पोफळ, कडुलिंब, चिंच, बोर, चिकू, पेरू, निलगिरी, पिंपळ, धूप अशी वेगवेगळी झाडे लाण्यात आली. गोमंतक भांडारी समाजाचे उपाध्यक्ष दयानंद नाईक, साळगाव मतदारसंघाचे माजी पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर, बार्देश तालुका महिला भंडारी समाज अध्यक्ष मेधा परुळेकर, म्हापसा नगरपालिका अध्यक्षा शुभांगी वायंगणकर व इतर महिला वर्ग उपस्थित होता. प्रारंभी वृक्षरोपणाचे वाटप व वृक्षरोपण करण्यात आले. मेधा परुळेकर यांनी स्वागत केले तर प्रगती पेडणेकर यांनी आभार मानले.









