वार्ताहर/ उचगाव
ग्रामीण भागातील पत्रकारांना ‘पत्रकार’ पुरस्कार देऊन गौरव करणाऱया सार्वजनिक वाचनालयाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. पत्रकारांचा सन्मान करणारी ही जुनी संस्था खरोखरच अभिनंदनास पात्र आहे, असे मनोगत ता. म. एकीकरण समितीचे सरचिटनीस मनोज पावशे यांनी व्यक्त केले.
सुळगा (हिं.) येथील बेळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी संघामार्फत सार्वजनिक वाचनालयाचा पत्रकार पुरस्कार विजेते एन. ओ. चौगुले व राष्ट्रीय स्तरावर कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक विजेती शितल पाटील यांच्या सत्कार समारंभात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून संचालक लक्ष्मण चौगुले, लक्ष्मण खांडेकर, निंगाप्पा देसूरकर, कृष्णा पाटील, मारुती पाटील, परशराम गडकरी, संजय पाटील, यल्लाप्पा बाळेकुंद्री, राकेश खांडेकर, ज्योती चौगुले, रेखा तुप्पट उपस्थित होत्या.
उपस्थितांचे स्वागत प्रकाश बेळगुंदकर यांनी केले तर एन. ओ. चौगुले यांचा सत्कार अशोक पाटील यांनी केला. शितल पाटील यांचा सत्कार मनोज पावशे यांच्या हस्ते भगवा फेटा बांधून, शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना एन. ओ. चौगुले व शितल पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रकाश बेळगुंदकर यांनी केले. तर एन. वाय. चौगुले यांनी आभार मानले.









