प्रतिनिधी /बेळगाव
येथील सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 191 वी जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. वाचनालयाच्या अध्यक्षा सुनीता मोहिते यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी वाचनालयाचे कार्यकारी सदस्य अनंत लाड यांनी ‘सावित्रीबाई फुले यांचे जीवन व कार्य’ या विषयावर संक्षिप्त माहिती
दिली.
यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष नेताजी जाधव, कार्यवाह रघुनाथ बांडगी, सहकार्यवाह ऍड. आय. जी. मुचंडी, कार्यकारी सदस्य अभय याळगी, लता पाटील, संतोष नलवडे, प्रताप पाटील, प्रसन्न हेरेकर व व्यवस्थापक विठ्ठल कडगावकर उपस्थित होते.









