बेळगाव तालुक्मयातील विविध विकासकामांना देण्यात येणार लवकरच चालना
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव तालुक्मयातील विकासकामे आणि विशेषकरून शाळांमध्ये शौचालय, पाणी आणि संरक्षक भिंती आहेत की नाही, याची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते बिरादार पाटील यांनी गुरुवारी तालुक्मयातील विविध ग्राम पंचायतींना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनीही विविध कामांची माहिती दिली. आंबेवाडी व कंग्राळी येथील शाळांना त्यांनी भेट
दिली.
बेळगाव तालुक्मयातील शाळांमध्ये विविध विकासकामे राबविण्यात आली आहेत. मात्र, अजूनही अनेक शाळांमध्ये निधीअभावी कामे अर्धवट आहेत. अनेक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून त्यासाठी निधी मंजूर करावा. याचबरोबर संरक्षक भिंतींसाठीही प्रयत्न होण्याची गरज आहे. बेळगाव तालुक्मयातील बालस्नेही योजनेंतर्गत अनेक अंगणवाडय़ांची दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यात आली आहे. मात्र, सरकारी प्राथमिक शाळांकडे दुर्लक्ष होत आहे. निधी असेल तर या शाळांचाही लूक बदलण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू, असे कलादगी यांनी अभियंत्यांना सांगितले.
बेळगाव तालुक्मयात काही ठिकाणी शाळांची अवस्था सुधारण्यात आली आहे. वेगवेगळय़ा माध्यमातून निधी मंजूर करून ही कामे करण्यात आली आहेत. मात्र, अनेक ठिकाणी कामे रेंगाळत आहेत. ती तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज पाटील यांनी व्यक्त केली. महत्त्वाचे म्हणजे ज्या शाळांमध्ये पाण्याची समस्या आहे ती तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज व्यक्त होत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे स्पष्ट करण्यात आले. यावेळी तालुका पंचायतचे साहाय्यक सचिव राजेंद्र मोरबद, पीडीओ व नागरिक उपस्थित होते.









