नवी दिल्ली
सर्वाजनिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱया बँकांना (पीएसबी) येत्या दोन वर्षात जवळपास 2100 अब्ज रुपयाच्या बाहेरील भांडवलाची गरज भासणार असून ही भांडवल उभारणी करण्यासाठी सरकारी समर्थनाचा सर्वात विश्वासू स्रोत शोधण्याची आवश्यकता असल्याचे मूडीज इन्वेस्टर्स सर्व्हिसेस यांनी सांगितले आहे. भारतामधील आर्थिक विकासात वेगाने होणारी घसरण आणि कोरोना विषाणूचा प्रकोप यामुळे पीएसबीची आर्थिक गुणवत्ता एका टप्प्यावर पोहोचणार असून यामध्ये कर्जाचा वेग वाढणार असल्याचे मूडीजने म्हटले आहे. पीएसबीची कमजोर भांडवलाचे भांडार झाले असून ते सध्या 1,900 अब्ज रुपयावर आहे. त्यामुळे नुकसान भरपाई होण्यासाठी आणखीन दोन वर्ष लागणार असून त्याच्यासाठी बाहेरुन भांडवल उभारणी करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे मूडीजचे उपाध्यक्ष आणि वरि÷ कर्ज अधिकारी अल्का अंबरासू यांनी म्हटले आहे.









