प्रतिनिधी / मिरज
शहरातील संजयगांधीनगर येथे सार्वजनिक रस्त्यावर उभारुन धिंगाणा घालून सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या तिघा तरुणांना महात्मा गांधी चौकी पोलिसांनी अटक केली आहे. सदर तिघेजण रस्त्यावर उभे राहून एकमेकांशी भांडत असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये अनुराज तानाजी होळकर (वय २६, रा. संजयगांधीनगर), प्रमोद माणिक पवार (वय ३०, रा. अस्वले कॉलनी) आणि राहूल दिपक अशिलगेकर (वय २२, रा. राजारामपूरी दुसरी गल्ली, मातंग वसाहत) यांचा समावेश आहे. सदर तिघेजण संजयगांधीनगर येथे सार्वजनिक रस्त्यावरुन उभारुन धिंगाणा घालत होते. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता अधिनियम कायद्यांतर्गत १६० कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








