प्रतिनिधी / कोल्हापूर
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी'चे निबंधक अशोक पाटील यांनी विद्यापीठाला सदिच्छा भेट दिली. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी ग्रंथभेट देवून स्वागत केले. अपर जिल्हाधिकारी असलेले पाटील हे मूळचे अंबप-पाडळी (ता. हातकणंगले) येथील असूनसारथी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अनेक उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. सारथी'च्या योजनेतून 53 विद्यार्थी केंद्रीय सेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. शंभर विद्यार्थ्यांना पीएच. डी. साठी फेलोशीप देण्यात येत आहे. पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या 5 हजार उमेदवारांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दोन हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकासासाठी तीन महिन्यांचे अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. बहुजन समाजातील अनेक होतकरू विद्यार्थी त्यामुळे शिक्षण आणि नोकरीच्या प्रवाहात सामील होऊ शकतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
सारथी’तर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी शिवाजी विद्यापीठ सुरवातीपासूनच प्रयत्नशील असून संयुक्त विद्यमाने विद्यार्थीहिताचे इतरही काही उपक्रम राबविता आले, तर त्यासाठीही विद्यापीठ सकारात्मक आहे, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. या वेळी प्राणिशास्त्र अधिविभागातील डॉ. ए. डी. जाधव उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









