जयपूर
भारतात गेल्या 5 महिन्याच्या कालावधीत सायकल विक्रीत कमालीची प्रगती दिसून आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही वाढ लक्षणीय झाली आहे. वाहतुकीसाठी कमी खर्चिक अशी ही सायकल घेण्याकडे भारतीयांचा कल दिसून आला. आपल्या आवडीची सायकल घेण्याकरीता काहींनी बुकींग करून काही दिवस थांबणेही पसंत केले होते, असे दिसून आले आहे. कोरोनानंतर आरोग्याबाबत अधिक जागरूक झालेल्यांनी फीट राहण्यासाठी म्हणून सायकल खरेदी केली आहे. मे ते सप्टेंबर 2020 या 5 महिन्यात 41 लाख 80 हजार 945 सायकल्सची विक्री झाल्याची माहिती ऑल इंडिया बायसीकल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनने दिली.









